Shivsena :  Sanjay Raut
Shivsena : Sanjay Raut  Sarkarnama
मुंबई

Shivsena : 'तुमच्या फालतुगिरीमुळेच उद्धव ठाकरेंना रस्त्यावर यायची वेळ' : भाजप आमदाराचा राऊंतावर हल्लाबोल

सरकारनामा ब्यूरो

Ram Satpute : माळशिरस मतदारसंघाचे भाजपचे युवा आमदार राम सातपुते यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या ट्विटला प्रत्युत्तर देत त्यांच्यावर घणाघाती आरोप केला आहे. 'आपल्या जीवाला धोका असून मुख्यमंत्र्यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी आपल्याला जीवे मारण्याची एका गुंडाला सुपारी दिले असल्याचे आरोप,' राऊतांनी केला होता.

राऊतांच्या या आरोपावर फडणवीसांनी उत्तर देताना, "ते सनसनाटी निर्माण करण्यासाठी असे आरोप करतात, प्रसिद्धीची त्यांना सवय आहे," असे फडणवीस म्हणाले. यावर पुन्हा ट्वीट करून राऊत यांनी फडणवीसांवर बरसले होते.

राऊत म्हणाले की, "हे जबाबदार गृहमंत्र्यांचे उत्तर नाही.सनसनाटी निर्माण करण्याचे शिक्षण तुमच्या प्रतिष्ठान मध्ये मिळत असेल.बाळासाहेब ठाकरे स्कूल मध्ये नाही सेनेतून फुटून गेलेल्या आमदार व चिल्लर गद्दार महामंडळास इतका फौजफाटा कशासाठी? चोर आणि गुंडांची बाजू घेऊ नका. गृहमंत्री आहात याचे भान ठेवा.."

राऊतांच्या या ट्विटवर आता सातपुते यांनी प्रत्युत्तर देताना जोरदार प्रहार केला आहे. सातपुते म्हणाले, "तुम्ही सत्तेसाठी सोनियाचे तळवे चाटले, त्यामुळे बाळासाहेबांच नाव घेण्याचा अधिकार तुम्ही कधीच गमावला आहे. तुमच्या असल्या फालतूगिरी मुळेच उद्धव ठाकरेंना दोन मुलांच राजकिय भविष्य खुटीला टांगून रस्त्यावर यायची वेळ आली आहे, अशा आशयाचे ट्वीट सातपुते यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT