Uddhav Thackeray On Chandrakant Patil Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray : मुलींच्या मोफत शिक्षणावरुन ठाकरेंचा चंद्रकांतदादांना टोला; म्हणाले, आश्वासनाचं चॉकलेट...

Uddhav Thackeray Press Conference : महाराष्ट्राच्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर सडकून टीका केली.

Jagdish Patil

Uddhav Thackeray Press Conference : महाराष्ट्राच्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाला आज गुरुवारपासून (ता.27 जून) सुरूवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर सडकून टीका केली.

पोलिस भरती, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, वाढती बेरोजगोरी आणि मुलींच्या मोफत शिक्षणाची अंमलबजावणी अशा अनेक मुद्द्यांवरुन त्यांनी सरकारवर घणाघात केला. तसंच यावेळी त्यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयात येऊन दिलेल्या चॉकलेटवरुनही टोला लगावला.

चंद्रकांत पाटलांनी (Chandrakant Patii) आम्हाला चॉकलेट दिलं तसंच मुलींच्या मोफत शिक्षणाच्या आश्वासनाचं चॉकलेट दिल्याची टीका उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केली. ते म्हणाले, "आतापर्यंत सरकारने मुलींच्या मोफत शिक्षणबाबत आश्वासन दिलं होतं, चंद्रकांतदादा आज मलाही चॉकलेट देऊन गेले, तसंच त्यांनी मोफत शिक्षणाचं चॉकलेट दिलं होतं, जे पोकळं ठरलं.

मात्र, आता योजनेची चॉकलेट देऊ नका, लोकांची सहनशक्ती संपली आहे. हे आम्हाला लोकसभा निवडणुकीच्या निकालातून दिसलं आहे. शिवाय उद्या काही योजनांची घोषणा केली तर केवळं योजनेची गाजरं दाखवू नका त्या अंमलातही आणा.", अशा शब्दात त्यांनी सरकारवर निशाणा साधला.

केवळ बहिणीसाठी नको भावासाठीही योजना आणा

दरम्यान, यावेळी ठाकरे यांनी केवळ बहिणीसाठी नको तर भावासाठीही एखादी योजना आणा असं आवाहन सरकारला केलं. लाडकी बहीण योजनेवर बोलताना ते म्हणाले, "हे सरकार लाडकी बहीण योजना आणणार असल्याचं समजलं. पण त्यांनी लाडकी बहीणप्रमाणे लाडका भाऊ योजनादेखील आणावी. आता महिलादेखील कर्तुत्ववान झाल्या आहेत. अनेक घरात कर्त्या पुरुषांप्रमाणे कर्त्या महिला आहेत. त्यामुळे आता दोघांमध्ये भेदभाव न करता तुम्ही दोघांसाठी योजना आणा."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT