Sanjay Raut 3 Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut : 'ते राजे आहेत, बोलण्यापेक्षा त्यांनी थेट पूर्तता करावी'; संजय राऊतांचा उदयनराजेंना टोला

ShivSenaUT Party MP Sanjay Raut Rahul Solapurkar Chhatrapati Shivaji Maharaj BJP MP Udayanraje Bhosale Mumbai media : राहुल सोलापूरकर यांच्या विधानावर भाजप खासदार उदयनराजे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर संजय राऊतांचा उपरोधात्मक टोला.

Pradeep Pendhare

Mumbai News : अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या विधानावर भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी संताप व्यक्त केला होता. औरंगजेबाची औलाद असून, अशांना गोळ्या घातल्या पाहिजे. राहुल सोलापूरकर जिथं असेल, तिथं ठेचा, अशी संतप्त प्रतिक्रिया दिली होती.

खासदार भोसले यांच्या या प्रतिक्रियेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी उपरोधात्मक टोला लगावला आहे.

संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, "त्यांनी स्वतः त्याची पूर्तता करावी. ते राजे आहेत. आम्ही त्यांचे मार्गदर्शन नेहमी घेतो. कोल्हापूरचे महाराज किंवा साताऱ्याचे महाराज असतील, त्यांचा आम्ही संताप समजू शकते. पण ते राजे आहेत, आम्ही प्रजा आहोत शिवाजी महाराजांची आम्हाला अधिक तळमळ आणि तिडीक आहे".

राहुल सोलापूकर यांच्यासारखी अशी अनेक विधानं संघाकडून (RSS) आणि त्यांच्या लोक होतात. विधान अंगलट आल्यावर माघार घेतात, यावर संजय राऊत यांनी निशाणा साधला. म्हणाले, 'हा संघाचा अजेंडा आहे. आमच्या महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान करणं, हा संघाचा अजेंडा आहे. कधी सावरकरांवर घसरतील, कधी गांधींवर घसरतील, आता तर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर घसरायला लागलेत. अनेक प्रकाराचे विकृत चिपत्रट निर्माण करून, संभाजीराजेंचे विकृत चित्रण करण्यात आले. काय करत आहे सरकार, या सरकारनं चिरडून मरावं, अशी परिस्थिती आहे".

महाकुंभमेळाव्याला कधी जाणार यावर संजय राऊत यांनी आम्ही प्रयागराजला जाणार आहोत. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी जाऊन आले. आम्ही कामाख्याला नक्कीच जाणार नाही रेडे कापायला. पण, आम्ही श्रद्धावान हिंदू आहोत. श्रद्धेत आणि हिंदुत्वामध्ये गद्दारीला स्थान नाही. बेईमानीला स्थान नाही, असा टोला लगावला.

'तुमच्या राज्यात छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाला लाच देऊन सुटले, पळून गेले, असे सांगणारे, लोक राज्यात खुलेआम वावरतात, तुमच्या विचारांचे लोकं, सरकार काय करत आहे. तुम्ही आम्हाला सांगत आहे. चेंगरून कोण मरणार आहे, ते भविष्यात दिसेलच. शिवसेनेचे अनेक नेते जाऊ आले आहेत', असे संजय राऊत यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT