Shivshakti-Bhimshakti Alliance
Shivshakti-Bhimshakti Alliance  
मुंबई

Shivshakti-Bhimshakti Alliance : उद्धव ठाकरे उद्या युतीची घोषणा करणार?

सरकारनामा ब्युरो

Shivshakti-Bhimshakti Alliance : गेल्या काही दिवसांपासून राज्यात शिवशक्ती आणि भिमशक्ती युतीच्या चर्चा रंगल्या आहेत. याबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. उद्या म्हणजे २३ जानेवारी ला शिवशक्ती आणि भिमशक्तीच्या युतीची घोषणा होऊ शकते, अशी माहिती समोर आली आहे. उद्धव ठाकरे उद्या शिवसेना ( ठाकरे गट ) आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा करण्याची शक्यता आहे.

गेल्या दोन - तीन महिन्यांपासून शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीतील युतीच्या चर्चा सुरु होत्या. आम्हाला उद्धव ठाकरे यांचे हिंदुत्त्व मान्य असल्याचं वंचित चे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हणत उद्धव ठाकरे यांच्याकडे युतीचा प्रस्ताव मांडला होता. या युतीबाबत मागील अनेक दिवसांपासून दोन प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा सुरू होती. तसेच मध्यंतरी उद्धव ठाकरे व प्रकाश आंबेडकर यांची बैठकाही झाल्या होत्या.

नाशिक दौऱ्यावर असतानाही प्रकाश आंबेडकर यांनी युतीबाबत भाष्य केलं होतं. ''उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत आमची युती झाली आहे. मात्र, त्याचा जाहीर खुलासा झालेला नाही. पत्रकार परिषद घेऊन त्याचा जाहीर खुलासा करावा, अशी विनंती आम्ही उद्धव ठाकरेंना केली आहे. मात्र, आधी महाविकास आघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसशी आम्हाला चर्चा करु द्या,'' असं ठाकरेंनी सांगितलं आहे, अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली होती.

दरम्यान, ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या या युतीला काँग्रेस-राष्ट्रवादीचाही पाठिंबा असल्याची चर्चा आहे. पण वंचित बहुजन आघाडी महायुतीत सामील होणार री नाही, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर उद्या पत्रकार परिषद घेणार असून या सर्व गोष्टींचा उलगडा करणार आहेत. त्यामुळे उद्याच्या पत्रकार परिषदेत ते काय घोषणा करतात याकडे संपुर्ण राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT