Mira-Bhayandar BJP leaders Sarkarnama
मुंबई

Loksabha Election 2024 : मीरा- भाईंदरमध्ये भाजपला धक्का; 'MNS'चा पाठिंबा घेतल्याने, नाराज उत्तर भारतीय पदाधिकारी ठाकरे गटात!

Pankaj Rodekar

Mira-Bhayandar BJP News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकसभा निवडणुकीसाठी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिल्याची घोषणा, मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात मंगळवारी राज ठाकरे यांनी केली. यानंतर राज्यात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधी पक्षामधील नेत्यांकडून राज ठाकरेंच्या या निर्णयावर टीका केली गेली, तर सत्ताधारी पक्षांतील नेत्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

दरम्यान, राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे मीरा- भाईंदरमध्ये भाजपला फटका बसला आहे. येथील भाजपचे उत्तर भारतीयांचे प्रतिनिधीत्व करणारे ब्रिजेश तिवारी आणि त्यांच्यासोबत 40 ते 50 भाजप कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून भगवा हाती घेतला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज ठाकरे यांनी भाजपला दिलेल्या पाठिंब्यामुळे भाईंदर येथील उत्तर भारतीय लोक नाराज आहेत, असं बोललं जात आहे. आमच्या जखमा अजून ताज्या असल्याच्या प्रतिक्रिया यावेळी पक्ष प्रवेश करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

राज ठाकरेंनी काय म्हटलं? -

मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे(Raj Thackeray) म्हणाले, 'महाराष्ट्र नवनिर्माण सेना भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस... परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे. हे मी सगळ्यांसमोर जाहीर करतो. माझ्या गावागावांमधून सगळ्या महाराष्ट्रातून आलेल्या माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना मला फक्त एकच सांगायचं आहे, विधानसभेच्या तयारी लागा. जोरात विधानसभेच्या तयारीला लागा. पुढच्या गोष्टी पुढे. आपण कसलाही विचार न करता आता केवळ बांधणीचा विचार केला पाहिजे.'

तसेच 'त्यासाठी म्हणून मी महाराष्ट्रभर तुम्हाला सगळ्यांना भेटण्यासाठी लवकरच आपल्यासमोर येत आहे. आज जे काही मला मांडायचं होतं ते मी आपल्यासमोर मांडलेलं आहे. उद्या अजून सर समजा समोरच्याची पकपक झाली. तर अजून मी माझ्या तोंडाची दारं-खिडक्या उघडण्यासाठी मी मोकळा आहे, आपण निश्चिंत रहा.' असंही राज ठाकरेंनी म्हटलं.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT