Congress News : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली. यावेळी पटोले यांनी विविध प्रश्नांवर भाष्य केले आहे. पुण्याची पोटनिवडणुक, काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस, अदानी प्रकरण इत्यादी प्रश्नांवर त्यांनी प्रतिक्रिया देत, तसेच मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. या दोन नेत्यांच्या पत्रकार परिषेदेमुळे काँग्रेसमध्ये सर्व काही अलबेल असल्याचे दर्शवण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
यावेळी पटोले म्हणाले, 'आज केंद्र सरकारच्या यंत्रणांकडून पत्रकांवर, माध्यमावर दडपशाही केली जात आहे. हल्ले होत आहेत. आमचे नेते राहुल गांधी तसेच पक्षाचे अध्यक्ष यावर आवाज उचलत आहेत. अदानीच्या घोट्याळ्यामुळे एलआयसी, सीबाआयमधील लोकांची पैशांची गुंतवणूक धोक्य़ात आली आहे," असे पटोले म्हणाले.
बाळासाहेब थोरात यांच्या कथित नाराजीनाट्य व नाराजीपत्रावर प्रश्न विचारले असता, पटोले म्हणाले, "मी तेच तुम्हाला विचारतोय की, थोरातांच्या नाराजीपत्राची एक तरी कॉपी दाखवा. बाळासाहेब नाराज नाहीत. असं कोणतंही पत्र नाही. तुम्हीच दाखवत होतात की ते नाराज आहेत मात्र, तशी परिस्थिती नाही.
यानंतर पत्रकारांनी नानांना विचारलं की, 'काँग्रेस प्रभारी एच के पाटील यांनी स्वत: मान्य केलं, त्यांना राजीनामा दिलाय. पण ते काँग्रेस पक्षाने मंजूर केलेला नाही, आता तुम्हीच म्हणताय की, असं पत्र नाही. मग खरं कोणाचं मानायचं? यावर पटोले आणि काँग्रेस नेते हसून, या प्रश्नाला उत्तर देणे टाळले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.