Shrikant Shinde sarkarnama
मुंबई

राष्ट्रवादीकडून व्हायरल फोटोवर श्रीकांत शिंदेचं स्पष्टीकरण : 'ते तर घरचं कार्यालय...'

Shrikant Shinde : मुख्यमंत्र्यांच्या फलकासमोर उभा राहिलो तर त्याचा कदाचित वेगळा अर्थ काढू शकतात.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या राजधानी दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर असताना त्यांच्या गैरहजेरीत त्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे मुख्यंमंत्र्यांच्या खुर्चीवर बसून मुख्यमंत्री पदाचा कारभार चालवत आहेत, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे करण्यात आला आहे. श्रीकांत शिंदे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसले असतानाचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आता स्वत: श्रीकांत शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत, या सर्व वादावर स्पष्टीकरण दिले आहे.

राष्ट्रवादीच्या आरोपावर बोलताना श्रीकांत शिंदे म्हणाले, या सर्व गोष्टी हास्यास्पद वाटतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सक्षम मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या खुर्चीवर बसून कोणालाही कारभार सांभाळण्याची काही गरज नाही. व्हायरल फोटोतलं कार्यालय हे घरचं आहे. ते शासकीय कार्यालय नाही. मी वर्षा निवासस्थानी बसलोय किंवा मंत्रालयाच्या मुख्यमंत्री कार्यालयात बसलोय, असं नाही. आम्ही दोघेही या घरच्या कार्यालयाचा वापर करतो. फोटा व्हायरल करून आम्हाला बदनाम करण्याचं काम विरोधकांकडून होतोय."

मुख्यमंत्री असा उल्लेख असलेला फलक तात्पुरता खुर्चीच्या मागे ठेवण्यात आले होते. आमच्या घरच्या कार्यालयात याची तात्पुरती व्यवस्ठा करण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांच्या फलकासमोर उभा राहिलो तर त्याचा कदाचित वेगळा अर्थ काढू शकतात, असेही श्रीकांत शिंदे म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राज्याचे प्रवक्ते रविकांत वर्पे यांनी श्रीकांत शिंदे यांचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसलेला फोटोच ट्विट केला आहे. ''खा.श्रीकांत शिंदे यांना सुपर सीएम झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत त्यांचे चिरंजीव मुख्यमंत्री पदाचा कारभार सांभाळतात. लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरू आहे .हा कोणता राजधर्म आहे? असा कसा हा धर्मवीर?' असे ट्विट करत शिंदे सरकारवर निशाणाही साधला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT