Deepali Sayed| Raj Thackeray
Deepali Sayed| Raj Thackeray Sarkarnama
मुंबई

अयोध्या दौऱ्याबाबत राज ठाकरेंचा आरोप, दिपाली सय्यद यांनी पुन्हा डिवचलं

सरकारनामा ब्युरो

Shivsena On Raj Thackeray

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची नुकतीच पुण्यात सभा पार पडली. यात त्यांनी अनेक मुद्द्यावर भाष्य केलं. अयोध्या दौरा स्थगित करण्याचेही कारण सांगितले. "मी अयोध्या दौरा तूर्तास स्थगित केल्यानं अनेकांना वाईट वाटलं, काही जणांनी कुत्सितपणे प्रतिक्रियाही दिल्या, अयोध्या दौऱ्याच्या निमित्तानं एक सापळा रचला गेला, त्याला रसद महाराष्ट्रातून पुरवली गेली," असा गंभीर आरोप मनसेचे (mns) अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी आजच्या सभेत केला.

या आरोपांनंतर शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी पुन्हा राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ''पत्रक घरोघरी दिल्यानंतर तुम्ही आदोंलन करून जेल मध्ये जाणार आणि अमित ठाकरे लपुन बसणार हा शिलेदारांसाठी मोठा ट्रॅप आहे. घाबरलेला भोंगा आज महाराष्ट्राने पाहिला.'' असे ट्विट करत दिपाली सय्यद यांनी राज ठाकरेंना डिवचलं आहे.

राज ठाकरे यांची आज पुण्यात जाहीर सभा झाली. राज ठाकरे यांचा अयोद्धा दौरा स्थगित झाल्यानंतरची ही त्यांची पहिली सभा होती. या सभेत राज ठाकरे (raj thackeray)काय बोलणार याकडे सगळ्याचे लक्ष होत. या सभेत त्यांनी भाजप, खासदार संजय राऊत, राणा दांपत्य, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडलं.

"माझी अयोध्या दौऱ्यांची तारीख ज्यांना तारीख खुपली, त्यांनीच हा सापळा रचला. त्यांना आमचं हिंदुत्व , भोंगे झोंबले, म्हणून त्यांनी हे केलं. उत्तरप्रदेशातील एक खासदार उठतो आणि मुख्यमंत्र्यांना आवाहन देतो. माफी मागण्यास सांगतो, हे त्यांना आता कसे आठवलं ? अयोद्धा दौऱ्यात माझ्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केलं असते, कार्यकर्त्यांना जेलमध्ये सडवलं असतं. ऐन निवडणुकीच्या वेळी मला कार्यकर्त्यांना गमावायचे नाही. माझी महाराष्ट्राची ताकद मी गमविणार नाही. मी वाटेल ती टीक सहन करण्यासाठी तयार आहे. माझ्या कार्यकर्त्यांना मी हकनार गमवणार नाही, पण यामुळे चुकीचे पायंडे पडत आहेत," असे राज ठाकरे म्हणाले.

या सभेलाही पोलिसांनी 13 विशेष अटी घातल्या होत्या. तरीही या सभेत राज ठाकरे जोरदार बॅटिंग केली. सभेत राज ठाकरे यांचा स्थगित झालेला अयोध्या दौरा हा प्रमुख मुद्दा होता. अयोद्धा दौरा स्थगित होण्यामागील कारणे त्यांनी सांगितली. मागील दोन आठवड्यात ज्यांनी ज्यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली, त्यांचा समाचार राज ठाकरे यांनी यावेळी घेतला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT