20 Congress Mlas letter to Sonia Gandhi
20 Congress Mlas letter to Sonia Gandhi Sarkarnama
मुंबई

संग्राम थोपटेंनी सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रावर 'या' वीस आमदारांच्या सह्या

सरकारनामा ब्युरो

मुंबई : भोरचे आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopte) यांच्या नेतृत्वाखाली वीस आमदारांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना पत्र लिहिलं आहे. महाराष्ट्रातील (Maharashtra) सद्याच्या राजकीय स्थितीविषयी माहिती देण्यासाठी या आमदारांनी सोनियांची वेळ मागितली आहे. यावरून राज्याच्या राजकारणात तर्कवितर्क लढवले जात आहेत. हे सर्व आमदार महाविकास आघाडी (MahaVikas Aghadi) सरकारवर नाराज असल्याची चर्चा असून त्यात अनेक बड्या नावांचाही समावेश आहे.

संग्राम थोपटे यांच्या लेटरहेडवर लिहिलेलं हे पत्र सोशल मीडियात व्हायरल झालं आहे. या पत्रात एकूण 28 आमदारांची नावं असली तरी प्रत्यक्षात 20 आमदारांच्या सह्या आहेत. या आमदारांमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातील पुरंदरचे आमदार संजय जगताप (Sanjay Jagtap) यांचाही समावेश आहे. त्याचप्रमाणे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे (Praniti Shinde), कुणाल पाटील (Kunal Patil), विक्रमसिंह सावंत, राजू आवळे, प्रतिभा धानोरकर, अमित झनक या आमदारांचाही समावेश आहे.

दरम्यान, पत्रातील 28 जणांच्या नावांच्या यादीत मंत्री विजय वडेट्टीवार यांचंही नाव आहे. मात्र त्यांनी सही केलेली नाही. तसेच सुरेश वडपूरकर, जितेश अंतापूरकर, सुभाष धोटे, धीरज देशमुख, राजेश एडके या नेत्यांची यादी नावे असली तरी त्यांनी सह्या केलेल्या नाहीत. दरम्यान, राज्यात सध्या काँग्रेसचे 43 आमदार असून त्यापैकी 28 जणांची नावे यादीत आहेत, तर 20 जणांनीच सह्या केल्या आहेत.

Letter Signed by 20 Congress MLAs

ही असू शकतात नाराजीची कारणं

काँग्रेसमधील काही आमदारांनी अनेकदा महाविकास आघाडीत दुजाभाव केला जात असल्याची नाराजी व्यक्त केली आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक रखडण्यासह निधी वाटपात असमानता, पक्षातील मंत्र्यांच्या कामकाजावर नाराजी, मंत्र्यांकडून अपेक्षित सहकार्य न मिळणे, अशा मुद्द्यांवरून काँग्रेस आमदारांमध्ये नाराजीची भावना असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सोनिया गांधी यांच्या भेटीविषयी उत्सुकता वाढली आहे.

या आमदारांची आहेत सह्या (कंसात मतदारसंघ)

1. अमित झनक (रिसोड)

2. हिरामण खोसकर (इगतपुरी)

3. विक्रमसिंह सावंत (जत)

4. संजय जगताप (पुरंदर)

5. कुणाल पाटील (धुळे ग्रामीण)

6. शिरीष चौधरी (रावेर)

7. प्रतिभा धानोरकर (वरोरा)

8. प्रणिती शिंदे (सोलापूर शहर मध्य)

9. राजु पारवे (उमरेड)

10. शिरीषकुमार नाईक (नवापूर)

11. कैलाश गौरंट्याल (जालना)

12. अमिन पटेल (मुंबादेवी)

13. राजू आवळे (हातकणंगले)

14. पी. एन. पाटील (करवीर)

15. सहसराम कोरोटे (आमगाव)

16. बळवंत वानखेडे (दर्यापूर)

17. लहू कानडे (श्रीरामपूर)

18. विकास ठाकरे (नागपूर पश्चिम)

19. मोहन हंबर्डे (नांदेड दक्षिण)

20. सुलभा खोडके (अमरावती)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT