मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवास्थानी झालेल्या हल्ला प्रकरणी पोलीसांवरही कारवाई करण्यात आली आहे. सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील (Vishwas nagare patil) यांनी परिमंडळ 2 चे डीसीपी योगेश कुमार यांना पदावरुन हटवले आहे. त्यांची दुसऱ्या ठिकाणी बदली करण्यात आली आहे. शरद पवार यांच्या सुरक्षा व्यवस्थेत झालेल्या चुकीमुळे ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
योगेश कुमार यांच्या जागी आता आयपीएस निलोत्पल यांची त्या जागी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, हल्ला प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सहआयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार यांच्या घरावर इतक्या मोठ्या संख्येने जमाव हल्ला करतो. त्या ठिकाणी प्रसारमाध्यमांचे कॅमेरे पोहोचतात पण पोलिस का पोहचू शकले नाहीत, असा सवाल शरद पवारांच्या समर्थकांकडून उपस्थित केला जात आहे. तर इतक्या मोठा जमाव शरद पवारांच्या घरापर्यंच पोहचून हल्ला करतो, हे गुप्तचर यंत्रणा, पोलीस यंत्रणांच अपयश असल्याचा चर्चा सध्या राज्यभरात सुरु आहेत.
दरम्यान या हल्ल्याप्रकरणी वकीस गुणरत्न सदावर्ते यांना न्यायलयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तर इतर 110 जणांनावरही अटकेची कारवाई करण्यात आली आहे. 7 एप्रिलला गुणरत्न सदावर्ते चिथावणीखोर भाषणात सिल्व्हर ओक येथे जाण्याचा इशारा दिला होता. या भाषणावेळी 8 तारखेला दुपारी 3 वाजता आंदोलक सिल्व्हर ओक येथे जाणार असल्याचे पोलिसांना आधीच कळाले होते. तेव्हा पोलिसही आझाद मैदानात उपस्थित होते त्यांनी याबाबत वरिष्ठांना माहिती दिली. तरी देखील शरद पवार यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला नाही. अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
तसेच पवार यांच्या घरासमोर घडलेल्या घटनेमुळे सर्वच नेत्यांनी पोलिसांवर आरोप केले आहेत. पवारांच्या घरावरील हा हल्ला म्हणजे राज्याच्या गृह विभागाचे अपयश असल्याच्या चर्चा सुरु आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीही पोलीस कमी पडल्याची कबुली देत आपल्याच पक्षाच्या गृहमंत्र्यांवर निशाणा साधला होता. ते म्हणाले होते की, हल्ल्यामागचा सूत्रधार पोलीस शोधत आहेत. या प्रकरणात पोलीस कुठेतरी कमी पडले. पोलिसांच्या हलगर्जीपणाबाबत वरिष्ठ माहिती घेत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.