मुंबई : ''पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra modi) यांचा ड्रीम प्रोजक्ट (Dream Projet) असलेल्या पिंपरी-चिंचवड (Pimpri-chinchwad) महापालिकेतील स्मार्ट सिटी योजनेत (Smart City Project) ७०० कोंटींचा गैरव्यवहार झाला आहे. आता हे सर्व घोटाळे बाहेर पडत आहेत. राज्यातून भ्रष्टाचार नष्ट व्हावा असे ज्यांना वाटत आहे, त्यांच्याकडे आम्ही हे प्रकरण पाठवले आहे. त्यांनी या प्रकरणाचा अभ्यास करावा. स्मार्ट सिटीचे काम ज्या क्रिस्टल कंपनीला दिले होते ती कंपनी कोणाची आहे. टेंडर देण्यासाठी सर्व नियम धाब्यावर का बसवले गेले. हे त्यांनी आधी सांगावे, त्यानंतर आम्ही त्यातले भ्रष्टाचार बाहेर काढू,'' असा सणसणीत टोला शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी भाजपला लगावला आहे.
- भ्रष्टाचार हा कोणत्याही राजकीय पक्षाचा, जातीचा, पंथाचा आणि धर्माचा नाही
माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत संजय राऊतांनी भाजपवर टिकास्त्र डागले आहे. ''पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी घोटाळा हे तर पहिलं नाव आहे. अशी 100 नावं आम्ही जाहीर करणार आहोत, भ्रष्टाचार हा कोणत्याही राजकीय पक्षाचा जातीचा, पंथाचा आणि धर्माचा नसतो, भ्रष्टाचार हा भ्रष्टाचार असतो. जे या भ्रष्टाचाराविरुद्ध लढत असतात, जे नेतृत्त्व करतात, त्यांनीही पक्ष पाहायचा नसतो. म्हणून मी ते योग्य ठिकाणी पाठवले आहे. आम्ही त्याची तक्रार दिली आहे,'' असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले आहे.
-स्मार्ट सिटी घोटाळा हा १००वा घोटाळा
''स्मार्ट सिटीचा हा सर्वात मोठा घोटाळा आहे. मी पंतप्रधानांना, गृहमंत्री अमित शहांना आणि त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या तपास यंत्रणांना आवाहन करतो की, मी जे कागद समोर आणले आहेत, त्यानुसार स्मार्ट सिटीचे काम करणारी क्रिस्टल कंपनी कोणाची आहे. कोणत्या राजकीय नेत्याची आहे, त्या कंपनीचा कर्ता-धर्ता कोण आहे. कोणासोबत फिरतात, कोणत्या पार्टीचे नेते आहेत. ते कोणाच्या आजूबाजूला फिरत असतात, हे एकदा समजून पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी समजून घेऊन त्यावर कारवाई करावी, त्यासाठी मी योग्य ठिकाणी हे पुरावे पाठले आहेत. ईडी, सीबीआय, लोकल पोलीस, कोणाकडे याची तक्रार द्यायची त्या ठिकाणी आम्ही हे पुरावे पाठवले असल्याचे संजय राऊतांनी सांगितले. याशिवाय, अशा १०० लोकांची लिस्ट माझ्याकडे आहेत, स्मार्ट सिटी घोटाळा हा १०० वा आहे, अजून ९९ नावे माझ्याकडे आहेत,'' असा इशाराही त्यांनी दिला आहे.
- १०० कोटी डोस, खरोखर पुर्ण झाले आहेत का
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी १०० कोटी लसीकरणाबाबत विचारले असता, या मद्द्यावरुनही त्यांनी मोदी सरकारचा समाचार घेतला आहे. १०० कोटी डोस, खरोखर पुर्ण झाले आहेत का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. झाले असेल तर आनंदच आहे, पण लसीकरणासंबंधी दररोज नवनवीन आकडे समोर येत आहेत. काहीजण म्हणत आहेत की ३३ कोटी लोकांचेच दोन डोस झाले आहे. तर काहींना दुसरा डोसच अद्याप मिळालेला नाही. पण अलीकडे या देशात उत्सव साजरा करण्याची प्रथाच पडली आहे. तसं असेल तर आपणही पंतप्रधान नरेंद्र मोंदींच्या उत्सवात सहभागी होऊयात. हा नुसता इव्हेंट सुरु आहे.
- बांग्लादेश आणि काश्मीर मधील हिंदूवर होणारे अत्याचार पंतप्रधानांसाठी आव्हान
बांग्लादेश आणि काश्मीरमध्ये हिंदूंवर अत्याचार होत आहेत, ते तेथून पलायन करत आहेत, ते तेथील अल्पसंख्यांक लोक आहेत. खासकरुन भारतासारख्या मजबूत देशात, जिथे नरेंद्र मोदींसारखा प्रखर राष्ट्रावादी, प्रखर हिंदूत्त्वादी पंतप्रधान असूनही जर बांग्लादेश, काश्मीरमधील दहशतवादी त्यांना घाबरत नसतील तर हे त्यांच्यासाठी सर्वात मोठे आव्हान असेल, असेही त्यांनी यावेळी नमुद केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.