मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात शिवसेनेत (Shivsena) फूट पडल्यानंतर आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या घरातच फूट पडण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांचा भाऊ जयदेव ठाकरे (Jaidev Thackeray) यांच्या दुसऱ्या पत्नी स्मिता ठाकरे या शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक माहिती सुत्रांनी दिली आहे.
स्मिता ठाकरे यांनी आज शिंदे यांची भेट घेतल्यानंतर याबाबतच्या बातम्या बाहेर आल्या असून पुढच्या ८ दिवसात त्या शिंदे गटात जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. भेटीनंतर बोलताना स्मिता ठाकरे म्हणाल्या की, एकनाथ शिंदे यांच्याकडे मी आदराने बघते. ते आमच्यासाठी खूप जुने कार्यकर्ते आहेत. एक व्यक्ती म्हणून मी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आले आहे.
स्मिता ठाकरे या बाळासाहेब ठाकरे यांचा मोठा मुलगा जयदेव ठाकरे यांच्या दुसऱ्या पत्नी होत्या. १९८७ मध्ये दोघांचा विवाह झाला होता. मात्र १९९५ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर जयदेव ठाकरे यांनी अनुराधा यांच्याशी तिसरा विवाह केला. मात्र याच विवाहावरुन बाळासाहेब ठाकरे आणि जयदेव ठाकरे यांचे संबंध बिघडले असल्याचे सांगितले जाते. बाळासाहेब ठाकरे यांना जयदेव यांचा हा विवाह करण्याचा निर्णय आवडला नसल्याचे बोलले जाते.
स्मिता ठाकरे या सध्या चित्रपट क्षेत्राशी संबंधित असून त्या चित्रपट निर्मित्या आहेत. सामाजिक कार्यातही स्मिता यांचे मोठे नाव असून अगदी सुरुवातीपासूनच त्यांना राजकीय महत्वकांक्षा असल्याचे दिसून येते. जयदेव ठाकरे यांना राजकारणात कोणताही रस नव्हता. मात्र स्मिता ठाकरे यांची राजकीय महत्वकांक्षा वाढत गेल्यानेच दोघांमध्ये बिनसले आणि जयदेव ठाकरे यांनी स्मिता यांच्यापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जाते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.