Maharashtra Political Crises
Maharashtra Political Crises  Sarkarnama
मुंबई

Maharashtra Political Crises :तर..आदित्य ठाकरेंसह 15 आमदार ठरणार अपात्र ?

सरकारनामा ब्युरो

Maharashtra Political Crises केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे पक्षचिन्ह असलेला धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला. यानंतरही उद्धव ठाकरेंवरील संकटे सुटण्याची चिन्हे अद्यापही कमी होताना दिसत नाहीयेत. याचं कारण म्हणजे आता उद्धव ठाकरेंच्या गटातील आदित्य ठाकरे यांच्यासह १५ आमदारांवर अपात्रेती टांगती तलवार आहे.

आगामी विधीमंडळ अधिवेशनात आदित्य ठाकरेंसह सर्व १५ आमदारांना शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांचा व्हिप पाळावा लागणार आहे. यासोबतच त्यांनी मांडलेल्या विधेयकांवर त्यांच्या बाजूने मतदान देखील करावं लागणार आहे. पण त्यांनी तसं न केल्यास आदित्य ठाकरेंसह ठाकरे गटाच्या १५ आमदारांवर अपात्रतेची कारवाई होऊ शकते. एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या १५ आमदारांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती.

आता निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हही एकनाथ शिंदे यांना दिले. यानंतर आता आगामी विधीमंडळाच्या अधिवेशनात ठाकरे गटातील १५ आमदारांवर अपात्रेची कारवाई होऊ शकते. महत्वाचं म्हणजे सर्वोच्च न्यायालयही विधानसभा अध्यक्षांना रोखू शकत नाही.त्यामुळे येणारा काळ ठाकरे गटासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात आता ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहे. येत्या 21 फेब्रुवारीपासून सर्वोच्च न्यायालयात नियमित सुनावणी होणार आहे. या निर्णयावर आम्ही न्यायालयात जाणार आहोत, आम्ही सर्वेोच्च न्यायालयात याला आव्हान देवू. धनुष्यबाण तुम्ही घेऊ शकणार नाही. तु्म्ही धनुष्यबाण काही काळ चोरू शकता. धनुष्यबाण चोरल्याचा आनंद त्यांना घेऊ द्या. शिवसैनिकांनो कुठेही खचू नका, मी खचलेलेन नाही.. शिवसेनाचा विजय हेईल, आता विजयाशिवाय माघार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT