Uddhav Thackeray Criticized BJP : समान नागरीकायद्याला आमचा पाठिंबा असेल, पण त्या कायद्याचा अर्थ सांगा, देशातील प्रत्येक नागरिकाला समान वागणूक द्या, त्या कायद्याने हिंदूनाच किती त्रास होणार आहे हेही सांगा. त्याआधीच तुमच हिंदूत्व स्पष्ट करा, मोहन भागवतांनी त्यांचं हिंदूत्व काय आहे हे त्यांनी सांगावं, असे खुले आव्हान उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला दिले आहे. मुंबईत आयोजित शिवसेनेच्या (Shivsena) महाशिबीरात ते बोलत होते.
यावेळी बोलताना त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. पुण्यात बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shaha) मला कलम ३७० बद्दल विचारल होतं. पण अदानीवरुन प्रश्न विचारले की शहांची बोबडी वळते, ज्यावेळी तुम्ही ३७० कलम हटवलं. त्यावेळी शिवसैनिक तुमच्या पाठिशी होते. पण आता तुम्ही सांगा ३७० कलम हटवूनही तुम्ही गेल्या पाच-सहा वर्षात तिथे निवडणुका का घेऊ शकले नाहीत. ३७० हटवूनही कश्मीरमध्ये हिंदू सुरक्षित का नाहीत. याकडेही त्यांनी लक्ष वेधलं आहे.
'मणिपूरमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून हिंसाचार माजला आहे. पण पंतप्रधान मोदी त्यावर एक शब्दही बोलायला तयार नाही, तिथे जायला तयार नाही. सत्तेची एवढीच मस्ती आहे तर ती मणिपूरला दाखवा. मणिपूर सीबीआय, यंत्रणा पाठवा. पण आता ते तिथे जाणार नाही. मोदी अमेरिकेत चालले पण मणिपूरला जाणार नाहीत. मणिपूर माझ्या देशातलं एक राज्य आहे. ते पेटलेलं आहे. मणिपूर शांत करून दाखवा. मोदींनी मणिपूरमध्ये जाऊन दाखवावं, ' असही आव्हान उद्धव ठाकरेंनी दिलं आहे.
ठाकरे म्हणाले, गद्दारांच्या फौजेचं नेतृत्व करण्यापेक्षा मूठभर निष्ठावंतांचं नेतृत्व करायला मला आवडेल. उद्या शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. तर परवा जागतिक गद्दार दिन आहे. तुम्ही आधी हात उचलू नका, पण कुणी हात उचलला तर तो हात वेगळा करा, असा आदेशही ठाकरेंनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला. आम्ही नामर्दाची औलाद नाही. यापुढे आमच्या पानिपतच्या युध्दावेळी ही अब्दाली बाहेर पडून आला होता. त्याचं नावही शाह असं होतं. अमित शाह नाही, असा टोलाही यावेळी उध्दव ठाकरेंनी लगावला.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.