Mumbai Police
Mumbai Police  Sarkarnama
मुंबई

पोलीस लागले कामाला; सोशल मीडियातून तीन हजार पोस्ट हटवल्या

सरकारनामा ब्युरो

मुंबई : रामनवमी, हनुमान जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकांमध्ये झालेल्या वादातून देशातील अनेक राज्यांमध्ये दंगली उसळल्या होत्या. मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भूमिकेमुळे महाराष्ट्रातही तणावाचे वातावरण निर्माण होण्याची भीती राज्य सरकारला आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने लाऊडस्पीकरबाबत नियमावली तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सोशल मीडियातील (Social Media) धार्मिक तेढ वाढवणाऱ्या पोस्टवर पोलिसांची करडी नजर असून संबंधितांवर कारवाईही केली जाऊ शकते.

दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात यांसह अन्य काही राज्यांमध्ये रामनवमी व हनुमान जयंतीनिमित्त आयोजित मिरवणुकांदरम्यान हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. महाराष्ट्रतही (Maharashtra) काहीसे तणावाचे वातावरण आहे. राज ठाकरे यांनी राज्यातील मशिदींवरील भोंगे काढण्याबाबत अल्टीमेटम दिला आहे. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून गृह विभागाकडून तयारी केली जात आहे.

प्रामुख्याने सोशल मीडियातील मेसेजसवरही बारकाईने लक्ष दिले जात आहे. त्यासाठी सोशल मीडिया लॅब कार्यान्वित करण्यात आली असून त्यामाध्यमातून धार्मिक तेढ वाढवणाऱ्या संदेशांवर लक्ष देण्यात येत आहे. आतापर्यंत सुमारे तीन हजारांहून अधिक मेसेज डिलीट करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) दिली. तसेच संबंधितांवर पोलिसांकडून कारवाईही केली जाऊ शकते.

एक-दोन दिवसांत भोंग्यांबाबत नियमावली

पुढील एक-दोन दिवसांत भोंग्यांबाबत नियमावली तयार केली जाणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी दिली. राज्याचे पोलीस महासंचालक आणि मुंबई पोलीस आयुक्त ही नियमावली तयार करणार आहेत. राज्यातील कायदा-सुववस्था बिघडू नये, यासाठी प्रयत्न आहेत. शांतता भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असंही वळसे पाटील यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, दिलीप वळसे पाटील यांनी राज्यातील सर्व धार्मिक स्थळांवर भोंगे लावण्यासाठी स्थानिक पोलीस प्रशासनाची परवानगी घेणे बंधनकारक असल्याचे आदेश दिले आहेत. भाजप नेते मोहित कंबोज यांनी वळसे पाटील यांच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. 'दिलीप वळसे पाटील यांनी आज मंदिर असो किंवा मशीद असो लाऊडस्पीकर वाजवायचे असल्यास परवानगी घेऊन वाजवावी त्यांच्या या निर्णयाचे मी स्वागत करतो. येत्या काळात मशिदीवर लाऊडस्पीकर लावण्यासाठी जी नियमावली तुम्ही ठरवणार आहात, तीच नियमावली मंदिराच्या लाऊडस्पीकर बाबत ठरवावी, असंही कंबोज यांनी म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT