Somaiya vs Raut: सोमय्यावरील कारवाई गृहमंत्रालयाची; मुख्यमंत्री अशा लहान गोष्टीत पडत नाहीत  
मुंबई

Somaiya vs Raut: सोमय्यावरील कारवाई गृहमंत्रालयाची; मुख्यमंत्री अशा लहान गोष्टीत पडत नाहीत

मुख्यमंत्री अशा लहान गोष्टीत पडत नाहीत. कोणी कितीही खोटे आरोप केले तरी आमच्या सरकारला भोकं पडणार नाहीत,"

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : "तुमच्याकडे पुरावे असतील तर महाराष्ट्रात पोलीस, तपास यंत्रणा आहेत. महाराष्ट्र पोलीस दल, राज्यातील तपास संस्था निष्पक्षपणे तपास करत असतात. पण तुम्ही केंद्र सरकारच्या आदेशावर महाराष्ट्राच्या मंत्र्यांवर, प्रमुख लोकांवर आरोप करत असाल आणि त्यातून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल तर गृहमंत्रालय कारवाई करु शकतं. त्याची आता राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्याची गरज नाही. मी मुख्यमंत्र्यांशी याविषयी बोललो असून याचा मुख्यमंत्री कार्यालयाशी संबंध नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तसंच गृहमंत्रालयाला जर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे असं वाटलं असेल तर त्यांनी तशी कारवाई केली असेल अंसही म्हटलं," अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत ( Shivsena MP Sanjay Raut) यांनी सोमय्यांवरील कारवाईबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

"आरोप करणाऱ्यांवर काल जी काही कारवाई झाली ती गृहमंत्रालयाने केली आहे. मी पूर्ण माहिती घेतली असून गृहमंत्रालयाला (Home Ministry) कायदा आणि सुव्यवस्थेबाबत काही प्रश्न निर्माण होईल असं वाटलं. त्यातून ही कारवाई झाली असून यासंबंधी मुख्यमंत्र्यांवर आरोप करण्याची गरज नाही. मुख्यमंत्री अशा लहान गोष्टीत पडत नाहीत. कोणी कितीही खोटे आरोप केले तरी आमच्या सरकारला भोकं पडणार नाहीत," असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.


मराठी नाट्याला एक परंपरा, पावित्र्य आणि प्रतिष्ठा आहे. कालपासून जे काही घडत असलेल्या घडामोडी विरोधी पक्ष केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर, पाठबळावर करत आहे. हा महाराष्ट्र राज्य अस्थिर आणि बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. अशा प्रकारचे आरोप करुन लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करणं हा गेल्या काही दिवसांपासून विरोक्षी पक्षाकडून उपक्रम राबवला जात आहे," असा आरोप संजय राऊत यांनी केला.

" चंद्रावर, मंगळावर जाऊन किरीट सोमय्यांनी आमच्या लोकांच्या जमिनी शोधाव्यात. या देशात लोकशाही, व्यक्तीस्वातंत्र्य आहे. महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे. असे आरोप याआधीही झाले आहेत. आरोप करणाऱ्यांच्या तोंडाला कोणी टाळं लावू शकत नाही. कोणी केंद्र सरकारच्या सूचनेनुसार आरोप करायचं ठरवलं असेल तर आम्ही काहीच करु शकत नाही," असं संजय राऊत यावेळी म्हणाले. "मोदी, अमित शाह यांच्यावरही आरोप होतात. आरोप करणं सध्या फॅशन झाली आहे, त्यानुसार त्यांनी आरोप करत राहावं," असंही यावेळी त्यांनी सांगितलं.

किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांना भगवा रंग सोडून हिरवा रंग धारण केल्याची टीका केली आहे. " आमचा रंग कोणता आहे तो त्यांना लवकरच कळेल. कायदेशीर कारवाई होत असेल तर रंगाचा प्रश्न का येतो? कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर तिरंगा पाहून कारवाई केली जात नाही. शिवसेनेवर असे आरोप करण्याआधी आपलं अंतरंग झाकून पाहावं हेच मला सांगायचं आहे". असा सणसणीत टोला संजय राऊत यांनी यावेळी लगावला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT