Anil Parab News :
Anil Parab News : Sarkarnama
मुंबई

Anil Parab News : सोमय्यांनी इथे यावचं, शिवसैनिक स्वागतासाठी तयार आहेत; परबांचं सोमय्यांना खुलं आव्हान

सरकारनामा ब्युरो

Anil Parab News : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यासह काही जणांनी या जागेवरुन माझ्याविरोधात म्हाडाकडे तक्रार केली. म्हाडाच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकून वांद्रे येथील कार्यालय तोडण्यासाठी दबाव टाकला. सोमय्यांनी बिल्डरची सुपारी घेऊन कार्यालय पाडण्यात आले, ते कार्यालय अनधिकृत नव्हते, तो इमारतीचाच एक भाग होता. असे स्पष्टीकरण माजी मंत्री अनिल परब यांनी केले आहे.

वांद्रे येथील म्हाडा कॉलनमधील अनिल परब यांचे अनधिकृत कार्यालय तोडण्यात आले. या पाडकामानंतर आज सकाळी अनिल परब यांनी याठिकाणी भेट देत पत्रकार परिषद घेत याबाबत भूमिका स्पष्ट केली.

अनिल परब म्हणाले की, या जागेतच माझा जन्म झाला, मी इथेच मोठा झालो, आमदार झाल्यानंतर येथील रहिवाश्यांच्या विनंतीवरुन मी या जागेतच माझे कार्यालय सुरु केले. येथील लोकांनी मला ही जागा वापरायला दिली. ही जागाच मुळात एलआयजी ची जागा आहे. पण किरीट सोमय्या यांनी म्हाडाकडे हे कार्यालय अनधिकृत असल्याची तक्रार केली. त्यानंतर इमारतीतील रहिवाश्यांनी कार्यालय नियमित करण्यासाठी म्हाडाकडे अर्ज केला. पण हे कार्यालय नियमित होऊ नये यासाठीही सोमय्यांनी दबाव टाकला. जागा नियमित होणार नाही असे म्हाडाने सांगितल्यावर मी ही जागा रिकामी केली. पण तरीही सोमय्यांनी कार्यालयाचे पाडकाम केले.

आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचंही घर तोडण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. आता मीही येथील रहिवाश्यांना घेऊन नारायण राणेंचे घर कसं तोडलंय, हे पाहायला जाणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून माझ्यावर आरोप झाले, मी काहीच बोललो नाही. पण आज ५६ रहिवाशांच्या वसाहतींचा प्रश्न आहे. गरबाच्या घरावर वरवंट फिरणार असेल तर मी शांत बसणार नाही. असंही अनिल परबांनी म्हटलं आहे.

जे आज त्यांच्या गटात आहेत त्यांच्याबद्दल सोमय्या एकही शब्द काढत नाही. आम्ही पक्ष बदलण्यासाठी ते आमच्यावर दबाव टाकत आहेत. मी मंंत्री होतो तोपर्यंत बंधनं होती, आता मी सामान्य शिवसैनिक आहे. म्हणून मी रस्त्यावर उतरणार आहे. किरीट सोमय्या हे पाडकाम पाहण्यासाठी येणार आहेत, त्यांनी यावं आता शिवसैनिकही त्यांच्या स्वागतासाठी तयार आहेत, असं खुलं आव्हान अनिल परब यांनी दिलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT