Abu Azami, Ajit Pawar
Abu Azami, Ajit Pawar Sarkarnama
मुंबई

Bhiwandi Lok Sabha: भिवंडीतील सपाचे नेते हातात घड्याळ बांधणार? सायकल मतपत्रिकेतून गायब होण्याची शक्यता

सरकारनामा ब्यूरो

Samajwadi Party Bhiwandi: मागील अनेक वर्षांपासून भिवंडीमध्ये समाजवादी पक्षाचे (Samajwadi Party) सायकल हे चिन्ह विविध निवडणुकीच्या मतपत्रिकेवर होते. मात्र, दोन दिवसांपासून समाजवादी पक्षाचे महाराष्ट्रातील नेतृत्व अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा सोशल मीडियासह टीव्हीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सुरु आहे. त्यामुळे भिवंडीतील लोकसभा निवडणुकीच्या मतपत्रिकेतून सायकल चिन्ह गायब होणार की काय? अशा चर्चांना उधाणा आलं आहे.

भिवंडीत (Bhiwandi) मुस्लिम मतदरांची संख्या जास्त असल्याने येथील मतदारांना आकर्षित करणारे काँग्रेस (Congress), समाजवादी आणि एमआयएम (MIM) हे तीन पक्ष गुण्यागोविंदाने नांदत होते. त्यामुळे भिवंडी लोकसभा (Bhiwandi Lok Sabha), विधानसभा आणि महानगरपालिका निवडणुकीत इतर राजकीय पक्षासह पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकत होते. त्यापैकी समाजवादी पक्षाने नेहमी आपले वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. एकदा भिवंडी विधानसभा तर दोन वेळा भिवंडी पूर्व विधानसभा असे तीन वेळा समाजवादी पक्ष निवडून आला होता. तर भिवंडी महानगरपालिकेचे पहिले स्थायी समितीचे सभापती समाजवादी पक्षाचे होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मागील महानगरपालिका निवडणुकीत प्रदेशाध्यक्ष अबू असीम आझमी (Abu Azmi) हे आजारी असल्याने सपाच्या अपेक्षित जागा निवडून आल्या नाहीत. पण आता समाजवादी पक्षाचे नेतृत्व करणारे अबू असीम आझमी आणि भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख हे प्रफुल्ल पटेलांबरोबर (Praful Patel) जाऊन अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे नेतृत्व स्वीकारत असतील तर समाजवादी पक्षाला कोण वाली राहील? अशी जोरदार चर्चा सुरु आहे.

याबाबत समाजवादी पक्षाचे शहराध्यक्ष रियाझ आझमी यांच्याशी फोनवरुन संपर्क होऊ शकला नाही. मात्र समाजवादी पक्षाचे प्रदेश महासचिव तथा भिवंडी मनपा नगरसेवक अजय यादव यांनी माझी अबू आझमी यांच्याशी चर्चा झाली असून त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात जाणार नसल्याचे सांगितलं असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आता खरंच हे नेते अजितदादांबरोबर जाणार की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

(Edited By Jagdish Patil)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT