Anil Parab  sarkarnama
मुंबई

हिवाळी अधिवेशन मुंबईतच का होणार अनिल परबांनी सांगितले कारण...

अधिवेशनाचा कालावधी निश्चित करण्यासाठी २४ डिसेंबरला बैठक घेण्याचे ठरले आहे.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूर (winter session) ऐवजी मुंबईमध्ये होणार आहे. हे अधिवेशन मुंबईमध्ये घेण्याचे कारण राज्याचे परिवहन मंत्री आणि संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केले आहे. परब म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची तब्येत ठीक नाही. त्यांना काही दिवस उड्डान करण्यास डॉक्टरांनी परवानगी नाकारली आहे. मुख्यमंत्र्यांना अधिवेशनाला हजर राहायचे आहे. त्यामुळे हे अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईला घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

परब म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तब्येत ठीक नाही. त्यांना डॉक्टरांनी काही दिवस उड्डान करण्याची परवानगी नाकारली आहे. त्यांना स्वतः या अधिवेशनात उपस्थित राहायचे आहे. त्यामुळे अधिवेशन मुंबईत घेण्याचे ठरले. आगामी अधिवेशनांपैकी कोणते अधिवेशन नागपूरला घ्यायचे याची मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे परब यांनी स्पष्ट केले.

अधिवेशनाचा कालावधी निश्चित करण्यासाठी २४ डिसेंबरला बैठक घेण्याचे ठरले आहे. त्यात अधिवेशनाचा कालावधी वाढवायचा की नाही त्यावर चर्चा होईल करण्यात येणार आहे. विरोधी पक्षाने अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूरला घेण्याची मागणी केली आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. आता फक्त अधिकाऱ्यांशी आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे परब यांनी सांगितले.

या वेळी परब यांनी एसटी आंदोलनावरही भाष्य केले. एसटी संपावर बोलताना परब म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व कोण करतो याच्याशी आम्हाला देणेघेणे नाही. आम्हाला कामगारांशी देणेघेणे आहे. कामगारांची दिशाभूल होऊ नये. प्रत्येकजण एसटी कामगारांच्या आंदोलनावर स्वार होण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, काही दिवसांनी त्यांना सरकारची कृती योग्य असल्याचे लक्षात येते. त्यानंतर ते माघार घेतात. परंतु या दिवसांमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचे जे नुकसान होते त्याची जबाबदारी कोणताही नेता घेत नाही, असा टोला परब यांनी लगावला. जो नेता एसटी आंदोलनाची जबाबदारी घेतो, त्याने कामगारांच्या नुकसानाची देखील जबाबदारी घेतली पाहिजे. असे करताना कुणी दिसत नाही, असे परब म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT