Anil Deshmukh  Sarkarnama
मुंबई

देशमुखांची दिल्लीवारी टळली; न्यायालयानं सीबीआयला बजावलं

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना बुधवारी 11 एप्रिलपर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली. पण देशमुखांना दिल्लीला घेऊन जाण्यास न्यायालयाने सीबीआयला मनाई केली आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना बुधवारी 11 एप्रिलपर्यंत सीबीआय (CBI) कोठडी सुनावण्यात आली. पण देशमुखांना दिल्लीला घेऊन जाण्यास न्यायालयाने सीबीआयला मनाई केली आहे. त्यामुळे देशमुखांची दिल्लीवारी सध्यातरी टळली आहे. देशमुखांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या संमतीनंतरच त्यांना दिल्लीला घेऊन जाता येईल, असं न्यायालयानं सीबीआयला बजावलं आहे.

देशमुख यांनी मनी लाँर्डिंगप्रकरणात (Money Laundering) अटक केली होती. आता त्यांना 11 एप्रिलपर्यंत सीबीआय कोठडी सुनावणी आहे. देशमुखांच्या खांद्याला दुखापत झाल्याने जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना मंगळवारी डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांना सीबीआयने आर्थर रोड कारागृहातून ताब्यात घेत कोठडीसाठी विशेष सीबीआय न्यायालयात हजर केलं. सीबीआयचे वकील राज मोहन चांद यांनी देशमुखांना 10 दिवसलांची पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. पोलीस बदली व पोस्टींग प्रकरणात 4 कोटी 60 लाख रुपयांची लाच घेतल्याचे पुरावे असल्याचे सांगत त्यांनी पुढील चौकशीसाठी दिल्लीला नेण्याची परवानगी देण्याची मागणी केली.

दिल्लीला नेण्याची काय आवश्यकता आहे, असं न्यायालयाने विचारल्यानंतर चांद म्हणाले, 'सीबीआयचा संपूर्ण सेटअप दिल्लीत आहे. तिथेच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शास्त्रीय चौकशी तंत्र दिल्लीतच आहे. आरोपीला चौकशीचं ठिकाण ठरवण्याचा अधिकार नाही.' देशमुख यांच्यावतीने अॅड. अनिकेत निकम (Aniket Nikam) यांनी बाजू मांडली. त्यांनी देशमुखांना दिल्लीला नेण्याची गरज नसल्याचे सांगितले.

सीबीआयने त्यांची मुंबईतील कार्यालयात दोनदा तर अनेकदा तुरूंगात चौकशी केली आहे. त्यांना अनेक आजार आहेत. त्यांचं वय 73 असून एवढ्या लांबचा प्रवास करू शकत नाहीत. त्यांचा खांदा निखळला असून त्यावर शस्त्रक्रियेची गरज आहे. सीबीआय यांना आर्थर रोज तुरूंगातही चौकशी करू शकते. त्यांना कोठडीची गरज का आहे, असा प्रश्न उपस्थित करत निकम यांनी कोठडीला विरोध केला.

दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने देशमुखांना 11 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तसेच त्यांना दिल्लीला घेऊन जाण्यास मनाई केली आहे. जे. जे. रुग्णालयातील डॉक्टरांच्या संमतीशिवाय त्यांना नेता येणार नाही, असं न्यायालयानं स्पष्ट केलं. दरम्यान, सीबीआयने बडतर्फ सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Waze), देशमुखांचे स्वीय सहाय्यक संजीव पलांडे आणि सचिव कुंदन शिंदे यांना मंगळवारीच ताब्यात घेतलं आहे. न्यायालयानं त्यांना कोठडी सुनावली आहे. या चौघांनाही समोरासमोर बसवून चौकशी करायची असल्याने दिल्लीत नेणार असल्याचे सीबीआयने न्यायालयात सांगितले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT