Gunratna Sadavarte Sarkarnama
मुंबई

Msrtc Bank News : एसटी बँक संचालक मंडळाच्या बैठकीत राडा; सदावर्तेंचे रोहित पवारांवर गंभीर आरोप

Sachin Fulpagare

Maharashtra Politics Latest News : एसटी सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत अॅड गुणरत्न सदावर्ते यांच्या उपस्थितीवरून आज जोरदार राडा झाला. बँकेच्या संचालक मंडळावर सदस्य नसतानाही सदावर्ते आणि त्यांची पत्नी या बैठकीला उपस्थित राहिल्याने बंडखोर नऊ संचालकांनी आक्षेप घेतला. यावरून मोठा वाद झाला.

शरद पवारांचे विचार इथे चालणार नाहीत. पंडित नथुराम गोडसे, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराचे आम्ही पाईक आहोत. बँकेच्या व्यवहारांवरून रोहित पवारांनी विधानसभेत खोटे आरोप केले. रोहित पवार सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे नाही. त्यांनी न्यायालयाचा अवमान केला आहे. रोहित पवार आणि मराठा संघटनांनी विधिमंडळात चुकीच्या पद्धतीने चर्चा घडवून आणून एक फार्स निर्माण केला. रोहित पवारांना कष्टकरी सवाल विचारतीलच. परंतु, न्यायालयाचे दाखले देऊन व्यवस्थापकीय संचालक सौरभ पाटील यांची निवड वैध आहे, असे बहुमताने म्हटले. हा सगळा अहवाल सहकार आयुक्तांना पाठवणार आहोत, असे सदावर्ते म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सहकार आयुक्तांची दिशाभूल करणारी कागदपत्रे कोणी पाठवली, त्यांना कोणी-कोणी फोन केले? याची चौकशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करावी, अशी मागणी सदावर्ते यांनी केली. ही शरद पवारांची खेळी आहे. संचालक मंडळात गटबाजी झालेली नाही, असा आरोपही गुणरत्न सदावर्तेंनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT