ST Strike
ST Strike Sarkarnama
मुंबई

ST Strike News| ऐन दिवाळीत एसटी कर्मचारी पुन्हा संपावर?

सरकारनामा ब्युरो

ST Strike News| मुंबई : महाविकास आघाडी सरकार काळात एसटी संपामुळे संपूर्ण राज्यात वातावरण चांगलंच तापलं होतं. पण डिसेंबर २०२१मध्ये तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य केल्यानंतर संप मागे घेण्यात आला. पण आता पुन्हा ऐन दिवाळी तोंडावर आली असताना एसटी कर्मचारी संप करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

एसटीतील प्रशासकीय कर्मचारी व अधिकाऱ्यांचा पगार रखडला असून महिन्याची १० तारीख उलटली तरी अद्याप पगार झाला नाही. यामुळे औद्योगिक न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन झाल्याचा आरोप एसटी कर्मचाऱ्याकडून करण्यात येत आहे. उच्च न्यायालयाला दिलेली हमी पाळण्यात सरकार अपयशी ठरल्याची भावना कर्मचाऱ्यांच्या मनात आहे.

चालक, वाहक व यांत्रिक कर्माचाऱ्यांचाही निव्वळ पगार आहे. कामगारांचे पीएफ, विमा, घराचे हफ्ते थकले आहेत. दिवाळी मुख्यमंत्र्यांबद्दल कामगारांत तीव्र नाराजी असल्याने एसटी कर्मचारी पुन्हा संपावर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

गेल्या वर्षी महाराष्ट्र एसटी कर्मचारी संयुक्त कृती समितीने 27 ऑक्टोबर पासून आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संप सुरु केला होता. कोरोना महामारीमुळे (Covid 19) संकटात आर्थिक संकटात सापडलेल्या एसटी (ST) महामंडळाचे राज्यसरकारमध्ये विलीनीकरण करावे, या मागणीसह इतर मागण्यांसाठी आजपासून राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांनी (ST Employees) संप पुकारला होता.

त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने एसटी कामगारांना 28 टक्के महागाई भत्ता देणे आणि वाढीव घरभाडे भत्ता देण्याची मागणी राज्य सरकारने मान्य केली आहे. राज्य सरकारने या मागण्या मान्य केल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला. पण आता पुन्हा एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचा इशारा दिला. त्यामुळे आता राज्य सरकार कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर काय तोडगा काढणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT