Gopichand Padalkar, Sadabhau Khot
Gopichand Padalkar, Sadabhau Khot sarkarnama
मुंबई

ST Strike : पडळकर, खोत आपल्याच सरकारविरुद्ध मैदानात? 'या'साठी करणार आमरण उपोषण

सरकारनामा ब्युरो

ST Strike : भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी आमदार सदाभाऊ खोत एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी पुन्हा मैदानात उतरणार आहेत. सरकारविरोधात आमरण उपोषण करणार आहेत. येत्या 20 डिसेंबरपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या (ST Strike ) उर्वरित मागण्यांसाठी दोन्ही आमदार उपोषण करणार आहेत, अशी माहिती सेवा शक्ती संघर्ष एस. टी . कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस सतिश मेटकरी यांनी दिली आहे.

पडळकर, खोत यांचे राज्य सरकारला पत्र ?

एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी विधान परिषदेचे तत्कालीन सभापती रामराजे निंबाळकर यांच्या दालनात सर्व पक्षीय आमदारांची बैठक झाली होती. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांच्या 18 पैकी 16 मागण्यांवर चर्चा करुन त्या मागण्या मान्य करण्याचे करण्यात आले होते. त्यानंतर अद्यापही मंजूर झालेल्या मागण्यांची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाचे अध्यक्ष आमदार गोपीचंद पडळकर, कार्याध्यक्ष सदाभाऊ खोत, सरचिटणीस सतीश मेटकरी यांनी राज्य सरकारकडे या मागण्यां पूर्ण करण्याची मागणी केली आहे.

परंतु, सरकारकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे राष्ट्रीय परिवहन कर्मचाऱ्यांची आर्थिक परिस्थिती पाहता कर्मचाऱ्यांमध्ये पुन्हा संतापाचे वातावरण आहे. त्यामुळे आमच्या मागण्या मान्य न झाल्यास 20 डिसेंबर 2022 पासून नागपूर शहरात सुरूवात होणाऱ्या महाराष्ट्र सरकारच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान आम्ही आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार सदाभाऊ खोत यांच्याह पदाधिकारी अधिवेशनस्थळी विधानभवनाजवळ आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत 20 डिसेंबरपासून आमरण उपोषण करत आहोत, अशा मागणीचे पत्र पडळकर आणि खोत यांनी राज्य सरकारला दिले आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी 29 ऑक्टोबर 2021 पासून मुंबईतील आझाद मैदानावर आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला होता. हे आंदोलन जवळपास सहा महिने सुरु होते. एस टी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण व्हावे, या मागणीसाठी या प्रमुख मागणीसाठी एस टी कर्मचारी रस्त्त्यावर उतरले होते. या आंदोलनावर तत्कालीन ठाकरे सरकारने त्यावेळी एस. टी कर्मचाऱ्यांची पगारवाढ करण्यासह त्यांच्या अनेक मागण्या मान्य करण्यात आल्या. पण मान्य झालेल्या मागण्यांमधील अनेक मांगण्यांची अंमबजावणी अद्याप झालेली नाही. त्यामुळे आता पुन्हा उपोषण करण्यात येणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT