Uddhav Thackeray, Devendra Fadnavis
Uddhav Thackeray, Devendra Fadnavis sarkarnama
मुंबई

भाजपचे दोन-तीन नेते जेलमध्ये जाणार ; ट्रॅक रेकॅार्ड काढा, मुख्यमंत्री सरसावले

सरकारनामा ब्युरो

मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांच्या कंपनीची 6.25 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे.

बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सत्ताधारी महाविकास आघाडीतील पक्ष शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने केंद्रीय तपास यंत्रणा तैनात करून राज्य सरकार आणि नेत्यांना लक्ष्य करण्याच्या भाजपशी दोन हात करण्याचा एकमताने निर्णय घेतला.

पाटणकर यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईनंतर उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली नव्हती, त्यानंतर त्यांनी मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना सांगितले की, 'एकत्र लढू.' केंद्रीय यंत्रणाकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांची होत असलेली चैाकशी या विषयावर या बैठकीत वादळी चर्चा झाली. यावेळी उद्धव ठाकरे आक्रमक झाले. ते वीस मिनिटे या विषयावर बोलले असे सुत्रांनी सांगितले. कधी नव्हे इतके खालच्या पातळीवरचे राजकारण खेळले जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

''राज्यातील भाजपच्या दोन-तीन नेत्यांना तुरुंगात टाकल्याशिवाय आपल्याविरोधात केंद्रीय तपास यंत्रणाकडून सुरु असलेल्या कारवाया थांबणार नाहीत, ते बदल्याच्या भावनेने वागत आहेत, आपण शांत बसायचे का, असा सवाल ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला. ''देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळातील भाजपच्या खात्यांच्या ट्रॅक रेकॅार्ड काढा, अन् पुढची पावले उचला,'' अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी आपल्या सहकाऱ्यांनी दिल्या आहेत.

''तुम्ही आपआपल्या खात्यातील आधीच्या पाच वर्षातील प्रकरणांच्या फायली तयार करा, शेवटी माझी मदत घ्या,'' अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना दिल्या आहेत. ''आमच्याकडे भाजपच्या अनेक नेत्यांची बरीच प्रकरणे आहेत, पण त्यावर कारवाई करीत नसल्याने त्यांनी महाविकास आघाडी सरकारची भीती नाही, असे मत यावेळी उपस्थित मंत्र्यांनी मुख्यमंत्र्याजवळ व्यक्त केले. ''फडणवीस सरकारच्या काळातील गैरव्यवहाराची चैाकशी केली पाहिजे,'' असे या मंत्र्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT