Chandrasekhar Bawankule News Sarkarnama
मुंबई

Chandrashekhar Bawankule News : चंद्रशेखर बावनकुळेंनी हलके केले शिंदेंच्या मंत्र्यांचे टेन्शन; मंत्र्यांबाबतच्या निर्णयावर म्हणाले...

सरकारनामा ब्यूरो

Chandrashekhar Bawankule Latest News : राज्य मंत्रिमंडळ विस्ताराला भाजपच्या हायकमांडकडून हिरवा कंदिल दाखविण्यात आला आहे. मात्र, समाधानकारक काम न केलेल्या शिवसेनेच्या पाच मंत्र्यांना मंत्रिमंडळामधून वगळा, असा आदेश भाजपश्रेष्ठींनी दिला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

बावनकुळे म्हणाले, ''भाजपचा मी ३२ वर्षापासून कार्यकर्ता आहे. कुणाला मंत्री ठेवायचे कुणाला नाही ठेवायचे हा संपूर्ण अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आहे. भाजप कुणाला सल्ला द्यालला जात नाही. कुणाला मंत्री ठेवायचे त्यांच्या पक्षाचा शिंदे यांचा अधिकार आहे. भाजप अशा ठिकाणी नाक खुपसत नाही. आम्ही त्यांना सल्ला देणार नाही.''

''आमची युती आहे, भाजपमध्ये कुणाल मंत्री व्हायचे हे भाजप ठरवेल, आणि शिवसेनेचे शिंदे ठरवतील, असेही बावनकुळे म्हणाले. चुकीच्या गोष्टी सांगितला जात आहे. भाजप-शिवसेनेच्या युतीमध्ये धुसफूस वाढावी, यासाठी ही पुंगी सोडली आहे, ही गांजराची पुंगी आहे,'' असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, राज्यातील मंत्र्यांच्या कामावर भाजपची (BJP) एक यंत्रणा लक्ष ठेवून आहे. त्या यंत्रणेमार्फत राज्यातील मंत्र्यांचे अहवाल भाजप हायकमांडकडे पाठविला जातो. त्या यंत्रणेकडून दिलेल्या अहवालामध्ये शिंदे गटातील (Eknath Shinde) पाच मंत्र्यांच्या कामाबाबत नकारात्मक उल्लेख आहे. त्या अहवालाचा आधार घेऊनच भाजपच्या श्रेष्ठींनी शिंदे यांना ही सूचना केली आहे. याबाबतचे वृत्त एका दैनिकाने दिले होते. मात्र, असे कोणतेही आदेश भाजपने दिले नसल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

या पाच मंत्र्यांमध्ये आरोग्य मंत्री तानाजी सावंत, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, रोहयो आणि फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे आणि अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांच्या नावाची चर्चा आहे. या सर्व मंत्र्यांनी बंडाच्या वेळी एकनाथ शिंदे यांना खंबीरपणे साथ दिली आहे. यातील चौघे तर अगोदरच्या सरकारमध्येही मंत्री होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT