Deepak Kesarkar, Uddhav Thackeray News Sarkarnama
मुंबई

Deepak Kesarkar News : शरद पवार-अजित पवार बैठकीमुळे 'मातोश्री'ला धक्का; शिंदे गटाचे मंत्री केसरकरांचा दावा

Deepak Kesarkar, Uddhav Thackeray News : उद्धव ठाकरे यांच्यावर दीपक केसरकरांनी पुन्हा तोफ डागली.

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात पुण्यामध्ये नुकत्याच झालेल्या बैठकीनंतर उठलेले राजकीय वादळ अद्याप शमलेले नाही. त्यावरून आरोप, प्रत्यारोप सुरुच आहे. दरम्यान, या बैठकीमुळे महाविकास आघाडीत (मविआ) वादळ आले असून त्याचा 'मातोश्री'ने धसका घेतला असल्याचा दावा राज्याचे शालेय शिक्षणमंत्री आणि मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी बुधवारी मुंबईत केला.

यानिमित्ताने ठाकरे शिवसेनेचे (Shivsena) प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) केसरकरांनी पुन्हा तोफ डागली. आमचे सरकार जनतेची कामे करीत असून ती तुम्ही का केली नाही, असा बोचरा सवाल त्यांनी केला. आता सोबत असेलेले सोडून जाऊ नयेत म्हणून, तरी आता स्वता:मध्ये सुधारणा करा, असा टोला त्यांनी लगावला.

लोकांना भडकावचे आणि सहानुभूती मिळवायची हे आता खूप झाले, असा सल्लाही त्यांनी दिला. वैचारिक समानता नसूनही त्यांनी स्वार्थासाठी दोन्ही कॉंग्रेसबरोबर (Congress) राज्यात सत्ता स्थापन केली होती, असे ते म्हणाले. आमचा मार्ग वेगळा झाला असून जनता खूष आहे, तिला आम्ही न्याय देत आहोत, असा दावा त्यांनी केला.

राज्यातील 'मविआ' आणि देशपातळीवरील 'इंडिया' या दोन्ही विरोधकांच्या आघाड्यांवर केसरकरांनी टीकेचे बाण सोडले. आज न मागता निधी मिळत असल्याने मतदारसंघातील कामे होत आहेत. त्याचा 'मविआ'ने धसका घेतला आहे, असे सांगत त्यांनी राज्यातील पूर्वीच्या आघाडी सरकारला पुन्हा लक्ष्य केलं. 'इंडिया' हा काही पक्ष नसून त्यांना 'एनडीए'ला हरवता येणार नाही, असे ते म्हणाले. 'इंडिया`ने स्वार्थासाठी देशाला मागे नेण्याचा प्रयत्न केला, तर त्याविरुद्ध रान उठवू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT