Sangli News : सांगली (Sangli) जिल्ह्यातील आष्टा येथे काही दिवसापूर्वी पहाटे अज्ञातांनी छत्रपती शिवाजी महाराज (chhatrapati shivaji maharaj) यांचा पुतळा उभारला होता. त्यामुळे वाद निर्माण झाला आहे.
पुतळा उभारणीसाठी सरकारने परवानगी दिली नव्हती. त्यामुळे हा वाद पेटला आहे. गनिमी कावा करुन शिवप्रेमींनी हा पुतळा बसवला होता. (statue of chhatrapati shivaji maharaj in ashta news update)
आठ दिवसापूर्वी या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मंगळवारी शिवप्रेमींनी या पुतळ्याजवळ महाआरती करण्याचे जाहीर केले होते. त्यानंतर प्रशासनाने पुतळा परिसरात बंदोबस्त वाढवला होता. यावेळी परिसरामध्ये 144 कलम लागू करण्यात आलं होतं.
आंदोलक महाआरती करण्यावर ठाम होते. शिवाजी महाराज यांचा पुतळा हटविण्याच्या हालचालीची कुणकुण शिवप्रेमींना लागली होती. त्यामुळे त्यांनी सांगली- इस्लामपूर रस्त्यावर ठिय्याआंदोलन सुरु केले होते. यामुळे परिसरात काही काळ वाहतुक कोंडी झाली होती. यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये शाब्दीक बाचाबाची झाली. त्यामुळे येथे काही काळ तणाव होता.
मंगळवारी या संपूर्ण परिसरातील वीज खंडीत करण्यात आली होती. रात्री उशिरा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यात आला. आंदोलकांना पोलसांनी ताब्यात घेतलं आहे.या घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण शांत आहे. भाजपचे नेते निशिकांत पाटील यांच्यासह शिवप्रेमींना ताब्यात घेण्यात आले आहे. आता येथील परिस्थिती नियंत्रणाखाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.