Ajit Pawar News : Sharad Pawar
Ajit Pawar News : Sharad Pawar Sarekarnama
मुंबई

Ajit Pawar News : राजीनामा सत्र थांबवा, कुणाचेही मंजूर होणार नाहीत; अजित पवारांनी केले स्पष्ट !

सरकारनामा ब्यूरो

Sharad Pawar Resigns Live Update : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षापदावरून पायउतार होण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयानंतर महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघत आहेत. पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते शरद पवारांना निर्णय मागे घेण्याची विनंती करीत आहेत. मात्र याबाबत अजूनही शरद पवार हे फेरविचार करतील का? याबाबत चर्चांना उधाण येत आहे.

यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर अजित पवार यांनी शरद पवार यांचा सांगावा माध्यमांना सांगितला. अजित पवार म्हणाले, "राजीमाना सत्र थांबवलं गेलं पाहिजे. पक्षातल्या सर्व सहकाऱ्यांना, पदाधिकाऱ्यांना पवार साबेबांनी आवाहन केले आहे. माझ्या म्हणणाल्या प्रतिसाद द्या. माझं ऐकलं पाहिजे, असं पवार साहेबांवनी सांगितल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.

कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार करण्याकरीता दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागणार आहे. या सगळ्या गोष्टींचा गांभीर्याने विचार करणार आहे. असा प्रकराचा निरोप शरद पवारांनी दिला आहे, कार्यकर्त्यांनी आता तरी ऐकलं पाहिजे. आता तरी साहेबांचं ऐका. कार्यकर्त्यांनी हट्टीपणा सोडला पाहिजे. माझी सगळ्यांना विनंती आहे. मी साहेबांचा सांगावा घेऊन आलो आहे. त्याला सकारात्मक प्रतिसाद द्या. दोन ते तीन दिवस विचार विनिमय करायला द्या, असे अजित पवार म्हणाले.

दरम्यान, "पक्षाच्या अध्यक्षपदावरून पायउतार झालो असलो तरी, सार्वजनिक कार्यातून कुठेही दूर जाणार नाही. साठ दशकांहून अधिक काळ जनमानसांत काम करत आलोय आणि त्या सेवेत कोणताही खंड पडणार नाही. सार्वजनिक कार्यात मला अधिक वेळ देता येईल. मी कुठेही असेन, तिथे तुमच्यासाठी नेहमीप्रमाणे उपलब्ध असेन," असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT