Mumbai Crime News : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना धमकी देणाऱ्याला आज (१४ डिसेंबर) मुंबई पोलिसांनी बिहारमधून अटक केली. नारायण कुमार सोनी असे या तरुणाचे नाव आहे. शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी त्याने फोन करुन धमकी दिली होती. गेल्या चार - पाच महिन्यांपासून सोनी फोन करुन सातत्याने धमकी देत होता.
या प्रकरणी त्याच्याविरोधात पोलिसांनी इतरांना त्रास देणे आणि धमकी देणे या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे पवार यांना धमकावण्याबाबत त्याने अजबगजब खुलासा केला आहे. त्याच्या खुलाश्याने पोलीसही आश्चर्यचकित झाले आहेत.
गेल्या १० वर्षांपासून सोनी पुण्यात राहत होता. पुण्यात वास्तव्यास असतानाच त्याच्या पत्नीने त्याला सोडून दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न केले आणि ती त्याच्यासोबत राहू लागली. सोनी याने या बद्दलची तक्रार दाखल केली होती. पण शरद पवारांनी (Sharad Pawar) या प्रकरणात कोणतीही कारवाई केली नाही, त्यामुळेच आपण त्यांना धमकीचे फोन केले, असा खुलासा त्याने केला आहे. दरम्यान, सोनी हा तरुण मनोरुग्ण असल्याचेही पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. यापुर्वीही त्याने पवार यांना धमकी दिली होती. त्यावेळी त्याला समज देऊन सोडून दिले होते.
शरद पवार यांचा सोमवारी (दि.12) 82 वाढदिवस साजरा करण्यात आला. राष्ट्रवादी पक्षाकडून पवारांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईसह विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले होते. एकीकडे पवार यांच्या वाढदिवसामुळे पक्षात उत्साहाचं वातावरण असताना त्यांना धमकीचा आल्याने एकच खळबळ उडाली होती.
मुंबई पोलिसांनीही या धमकीच्या फोनची गांभीर्याने दखल घेतली आणि तपास सुरु केला. तपासादरम्यान पवार यांना धमकी देणारा बिहारमध्ये असल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी तातडीने बिहार गाठत सोनी याला ताब्यात घेतले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.