मुंबई : कृष्णा मराठवाडा प्रकल्पातील पाणी उपलब्धतेच्या प्रश्नावर राष्ट्रवादीचे (NCP) प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी विधान परिषदेत (Legislative Council) उत्तर दिले. सहा टिएमसी पिण्याचे पाणी या भागात उपलब्ध आहे. उर्वरित 16.66 टिएमसी पाणी कसे उपलब्ध होईल याचा अभ्यास जलसंपदा विभागाकडून (Department of Water Resources) सुरु आहे. कृष्णा लवादातील पाणी बाहेर देण्याची परवानगी नाही. राज्य सरकारची या भागाला पाणी देण्याची इच्छा आहेच मात्र तांत्रिक गोष्टींचा अभ्यास सुरु आहे. त्यानुसार यावर नक्की मार्ग काढला जाईल, असा विश्वास पाटलांनी व्यक्त केला.
पाटील म्हणाले, वळण बंधाऱ्यांचा वापर करून आपण नाशिक जिल्ह्यात पूर्वेचे पाणी पश्चिमेला आणण्याचा प्रयत्न करत आहोत. त्या कामाला मोठी गती आली आहे. काही प्रकल्प जून 2023 पर्यंत पूर्ण करण्याचा जलसंपदा विभागाचा प्रयत्न आहे. राज्यात अशाप्रकारचे 14 प्रकल्प पूर्ण झाले आहेत. भविष्यात 11 प्रकल्प पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. यातून मोठ्या प्रमाणात गोदावरी खोऱ्यात पाणी आणले जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
विदर्भातील सिंचन अनुशेष भरून काढण्याचा प्रश्न उपस्थित झाल्यामुळे यामध्ये राज्यपालांनी दिलेले निर्देश पाळून केलेल्या अनुशेष वाटपाचा अहवाल पाटलांनी सभागृहात वाचून दाखवला. कोळकेवाडी धरणातील 67.5 टिएमसी पाणी वीजनिर्मितीनंतर वशिष्ठी नदीत सोडण्यात येते. यातील साडेसतरा टीएमसी पाणी वशिष्ठी खोऱ्यात सिंचनासाठी व चिपळूण शहरात पिण्यासाठी व औद्योगिकीकरणासाठी सोडले जाते. उर्वरीत पन्नास टिएमसी शिल्लक पाणी उत्तर कोकणाला मिळावे याचा प्रयत्न सुरु आहे. दक्षिण रायगड जिल्ह्यात विकसित होणारा भाग पाहता तिथपासून नवी मुंबईपर्यंत पाण्याची गरज आहे. यासाठी वॅपकॉस या कंपनीमार्फत काम सुरु आहे. वशिष्ठी नदीचे पाणी चिपळूणपासून वर उचलून आणणे व एमएमआर रिजनमध्ये पाण्याची व्यवस्था निर्माण करणे याचा अभ्यास सुरु असल्याचेही पाटलांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.