Old Pension
Old Pension Sarkarnama
मुंबई

Old Pension Scheme : मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक यशस्वी; सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी 14 मार्चपासून संप पुकारला होता. मात्र, आज सरकारी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर महत्वाची बैठक पार पडली.

या बैठकीत जुनी पेन्शन योजनेच्या मागणीबाबत तोडगा काढण्यात आला आहे. हा संप मागे घेण्याबाबत मसुदा तयार करण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हा बेमुदत संप मागे घेण्यात आला आहे. 14 मार्चपासून आजपर्यंत (दि.20 मार्च) जवळपास सात दिवस हा संप सुरू होता.

सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे सामान्य जनतेला अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं. अनेक सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णांची मोठी गैरसोय झाल्याचे पाहायला मिळालं. तसेच या संपादरम्यान सरकारी कार्यालयातील कामकाजही ठप्प झालं होतं.

संपादरम्यान काही सरकारी कर्मचाऱ्यांनी काळ्याफिती लावून आणि काळे शर्ट घालून आंदोलन केलं. तसेच सरकारने जुनी पेन्शन योजनेबाबत योग्य निर्णय न घेतल्यास या संपाची धार यापुढेही तीव्र करण्यात येण्याचा इशाराही देण्यात आला होता. मात्र, आता हा संप मागे घेण्यात आला आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळातील विश्वास काटकर यांनी सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला असल्याची माहिती दिली. ''मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत एक समिती नेमण्यात आली आहे. त्यामुळे पुढील तीन महिन्यात ही समिती अहवाल सादर करेल'', असं काटकर यांनी यावेळी सांगितलं. तसेच उद्यापासून (दि.21 मार्च) सरकारी कर्मचारी कामावर हजर होणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT