Girish Mahajan meets Amit Shah
Girish Mahajan meets Amit Shah sarkarnama
मुंबई

सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजनांचे मंत्रीपद हुकणारच होते... पण कष्टाने वाचवले...

सरकारनामा ब्युरो

मुंबई : शिंदे सरकारचा बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळाचा विस्तार काल सकाळी पार पडला. यावेळी भाजपकडून ९ (BJP) आणि शिंदे गटाकडून (Eknath Shinde) ९ असे एकूण १८ मंत्री शपथबद्ध झाले. या मंत्रिमंडळात भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, विजयकुमार गावित, गिरीष महाजन, सुरेश खाडे, अतुल सावे, मंगल प्रभात लोढा यांना संधी देण्यात आली आहे. तर शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील, दादा भुसे, उदय सामंत, संदिपन भुमरे, संजय राठोड, शंभुराजे देसाई, दिपक केसरकर, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार यांची वर्णी लागली आहे. (Maharashtra Cabinet Expansion news)

शिंदे सरकारच्या या मंत्रिमंडळाचे खाते वाटप आज संध्याकाळपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या मंत्रिमंडळात काही मंत्र्यांची त्यातही चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवर आणि गिरीश महाजन या भाजपच्या नेत्यांची मंत्रिपद हुकणार हे जवळपास निश्चित झाले होते. मात्र ती त्यांनी कष्टाने वाचवली अशी माहिती एका वृत्तपत्राने दिली आहे. सरकारनामाने या वृत्ताची खातरजमा केलेली नाही. (Eknath Shinde ministry | Sudhir Mungantiwar | Girish Mahajan)

संबंधित वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, केंद्रातील मोदी-शहा-नड्डा यांची जोडी राज्यात गुजरात पॅटर्न आण्याच्या विचारत होती. सुरुवातीला दिल्ली पातळीवर याबाबतचा निर्णय झाला होता. शहा-नड्डा यांनी तर जुलैच्या पहिल्या आठवड्यात संबंधीचे सूतोवाच देखील केले होते. तसेच महाराष्ट्र प्रभारी सी.टी राव, राष्ट्रीय संघटन सरचिटणीस बी. एल संतोष यांच्याकडे तसा निरोप देखील दिला गेला होता. त्यातूनच भाजपाकडून मंत्रिमंडळ विस्तारात नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार होती. हा निर्णय राज्यात पोहोचताच मोठी खळबळ उडाली होती.

मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त लांबण्यामागे हे एक महत्वाचे आणि मोठे कारण होते. पण राज्यातील बड्या नेत्यांनी श्रेष्ठींकडे हट्ट धरत तो हाणून पाडल्याचे चित्र काल दिसून आले. गुजरात पॅटर्नच्या भीतीने दिल्लीत लॉबिंग सुरू झाले. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन यांनी गेल्या ८ दिवसांत दिल्ली गाठून हट्ट धरला आणि स्वत:सह ज्येष्ठांचा बचाव केला अशी खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे.

याशिवाय यावेळी दिल्लीतून आधीच्या काही गोष्टींची पुनरावृत्ती न करण्याची कडक समजही मंत्र्यांना दिली असल्याचेही सांगितले जात आहे. त्याचसोबत ज्यांचा शपथविधी झाला त्यात तिघांऐवजी डॉ. संजय कुटे, प्रविण दरेकर आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची नावे होती. पण ती कापण्यातही लॉबिंग करणाऱ्यांना यश आले. देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्याच अनुभवी लोकांना वगळण्यास विरोध केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत. दोन वर्षात लोकसभा-विधानसभेची निवडणूक आहे. त्यामुळे अनुभवी चेहरे लागतीलच अशी भूमिका फडणवीसांनी पक्षश्रेष्ठींकडे मांडली आणि महाजन, पाटील, मुनगंटीवारांची मंत्रिपद फायनल झाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT