Sunil gavaskar
Sunil gavaskar  
मुंबई

विधानभवनात  सुनील गावसकरांच्या एंट्रीने  भुवया उंचावल्या 

तुषार खरात : सरकारनामा न्यूज ब्युरो

मुंबई : अधिवेशनामुळे विधानभवनात सध्या राजकीय रणधुमाळी सुरू आहे. छोट्या कार्यकर्त्यांपासून ते मोठ्या पुढा-यांपर्यंत राजकारण्यांची विधीमंडळात सतत गर्दी असते. पण आज अचानक प्रसिद्ध क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी विधानभवनात एंट्री घेतली, अन् सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या.

गावसकर आले ते थेट परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या दालनात गेले. नंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली. वाहनांचे वाढते अपघात व वाहनांमुळे होणारे ध्वनीप्रदुषण टाळण्यासाठी गावसकर यांनी स्वत:हून पुढाकार घेतला आहे. गावसकर यांनी एका प्रदर्शनीय क्रिकेट सामन्याचे आयोजन केले आहे.

महेंद्रसिंग धोनी , शिखर धवन, सुरेश रैना यांसारखे रथी महारथी खेळाडू या सामन्यात खेळणार आहेत.
'नो हाँर्न प्लीज' आणि 'रस्ते सुरक्षा अभियान' असे दोन संघ तयार केले जाणार आहेत. या दोन्ही संघात येत्या २४ मार्च रोजी लढत होणार आहे.

या क्रिकेट सामन्याचे निमंत्रण फडणवीस व रावते यांना देण्यासाठी गावसकर विधानभवनात आले होते, असे सूत्रांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT