Sanjay Raut, Sunil Raut
Sanjay Raut, Sunil Raut sarkarnama
मुंबई

राऊतांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी; भाऊ सुनील राऊत म्हणाले...

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : शिवसेना (ShivSena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना कोर्टाने ४ ऑगस्टपर्यंत ईडी (ED) कोठडी सुनावली. ईडीकडून पत्राचाळ घोटाळा प्रकरणी राऊतांना अटक केली. त्यासाठी ईडीने कोर्टाकडे आठ दिवसांची कोठडी मागितली होती. कोर्टाने केवळ तीन दिवसांची कोठडी दिली आहे. यावर राऊत यांचे लहान भाऊ सुनील राऊतांनी (Sunil Raut) प्रतिक्रिया दिली. यात त्यांनी आपला न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याचे सांगितले.

तसेच राऊत भाजपविरोधात (BJP) बोलल्याने त्यांना ही शिक्षा दिली जात असल्याचा आरोप सुनील राऊत यांनी केला. रविवारी सकाळी साडेसात वाजता ईडीचे लोक माझ्या आणि संजय राऊत यांच्या घरी आले. त्यानंतर ते साडेचार वाजेपर्यंत चौकशी करत होते. ५ वाजता आम्हाला ईडीच्या कार्यालयाकडे घेऊन आले. साडेपाच-सहा वाजता आम्ही ईडीच्या कार्यालयात पोहचलो. रात्री १२.४० मिनिटांनी अटक केली असल्याचे ईडीच्या वतीने सांगण्यात आले, असेही सुनील राऊत यांनी सांगितले.

सकाळपासून आम्ही न्यायालयात त्यांची वाट पाहत होतो. साडेबारा-पावणे एक वाजता राऊत यांना जे. जे. रुग्णालयात घेऊन गेले. तेथून त्यांना न्यायालयात आण्यात आले. न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास असल्याचेही त्यांनी सांगितले. ईडीने न्यायालयाकडे आठ दिवसांची कोठडी मागितली. मात्र, केवळ तीन दिवसांची कोठडी दिली. ४ ऑगस्टला त्यांना परत न्यायालयासमोर हजर करण्यात येईल, असे सुनील राऊत म्हणाले.

मला विश्वास आहे संजय राऊत यांनी कुठलाही भ्रष्टाचार केला नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कमकुवत करण्यासाठी राऊतांना अटक करण्यात आली. मला खात्री आहे की, न्यायव्यवस्था आपले काम चोखपणे करेल व संजय राऊत यांना न्याय मिळेल, असेही राऊत यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT