Nawab Malik News Updates Sarkarnama
मुंबई

मलिकांना दिलासा नाहीच! सर्वोच्च न्यायालयाकडूनही दणका

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नबाव मलिक यांना सक्त वसुली संचालनालयाने अटक केली असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते व अल्पसंख्यांक विकासमंत्री नबाव मलिक (Nawab Malik) यांना सक्त वसुली संचालनालयाने (ED) अटक केली आहे. त्याविरोधात दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने मागील महिन्यात फेटाळली आहे. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) धाव घेतली होती. पण इथेही मलिकांना दिलासा मिळाला नाही. त्यांची याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. (Nawab Malik News Updates)

ईडीने अटक केल्याच्या विरोधात मलिक यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. ईडीची कारवाई चुकीची असल्याचा दावा त्यांनी केला होता. हे प्रकरण 22 वर्षांपूर्वीचे असल्याचेही त्यांनी म्हटले होते. पण न्यायालयाने मलिक यांची ही याचिका फेटाळून लावली. त्यामुळे त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर शुक्रवारी न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड आणि सुर्यकांत यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाविरूध्द ही याचिका होती. पण सर्वोच्च न्यायालयानेही याचिका फेटाळली आहे. ज्येष्ठ विधिज्ञ व काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी न्यायालयात मलिकांची बाजू मांडली. 1993 मध्ये झालेल्या घटनेसाठी 2022 मध्ये अटक कशी केली जाऊ शकते, असा दावा सिब्बल यांनी केला. पण न्यायाधीश सुर्यकांत यांनी संबंधित न्यायालयाकडे जामीनासाठी अर्ज करण्यास सांगत आम्ही या टप्प्यावर त्यात ढवळाढवळ करणार नाही, असं सांगितलं.

दरम्यान, मलिक यांनी गँगस्टर दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरला मालमत्तेसाठी पैसे दिले. पारकरने ते दाऊद इब्राहिमला दिले, असा दावा करत हे 'टेरर फंडिंग` असल्याचा आरोपी ईडीने केला आहे. मलिकांना 23 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली आहे. सध्या ते न्यायालयीन कोठडीत असून ईडीने गुरूवारी त्यांच्याविरोधात पाच हजार पानांचे आरोपपत्र विशेष न्यायालयात दाखल केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT