Supreme Court Final Decision on Shivsena Case : राज्यातील सत्तासंघर्षांवर आज गुरुवारी सर्वोच्च न्यायालय निकाल लागला. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठाने हा निर्णय दिला आहे. या निर्णयाकडे देशाचे लक्ष लागले होते. (Supreme Court Hearing On Shivsena MLA)
या निकालात शिवसेना कुणाची या दाव्यावर न्यायालयाने ठाकरे गट आणि शिंदे गटावर ताशेर ओढले. शिवसेना आमचीच, असा दावा कुणीही करु शकत नाही, असे न्यायालयाने आपल्या निकालात म्हटलं आहे. सोळा आमदार प्रकरण हे विधानसभा अध्यक्षांकडे सोपविण्यात आले आहे.
आज सकाळी सरन्यायाधीश साडेदहा वाजण्याच्या सुरवातील न्यायालयात आले. घटनापीठात सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्यासह न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली, न्यायमूर्ती एम. आर. शहा, न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा यांचा समावेश आहे. १५ मे रोजी न्यायमूर्ती एम. आर. शहा निवृत्त होत आहेत. २० मे ते २ जुलै अशी सुप्रीम कोर्टाची उन्हाळी सुटी असणार आहे. त्यामुळे हा निकाल आज (गुरुवारी) देण्यात आला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेसह सत्तासंघर्षांतील महत्त्वाच्या घडामोडींची घटनात्मक वैधता निश्चित होणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठ सकाळच्या वेळात राज्य सरकारचे भवितव्य ठरविणारा हा महत्त्वाचा निकाल देईल.
राज्यपालांनी हस्तक्षेप करु नये..
कोणीही मीच खरी शिवसेना असा दावा करु शकत नाही, असं म्हणत न्यायालयाने शिंदे गटाला सुनावलं आहे. न्यायालयानं शिंदेंना झटका दिला आहे. राज्यपाल, प्रतोद आणि व्हिप या मुद्द्यांवरुन शिंदे गटाला सुनावलं आहे. राज्यपालांनी घेतलेले सर्व निर्णय हे चुकीचं असल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे. राज्यपालांनी कोणत्याही एका पक्षाला पाठिंबा देणं हे चुकीचं आहे, असंही सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. प्रतोद नियुक्तीत राज्यपालांनी हस्तक्षेप करु नये, असे न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.
सुप्रीम कोर्टात सुमारे नऊ महिने चाललेल्या प्रदीर्घ सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत निर्णय राखून ठेवला होता. त्यावर न्यायालयाने आज निर्णय दिला. गेल्या वर्षी जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाच्या आमदारांनी शिवसेनेविरोधात बंड केले. तेव्हापासून या सत्तासंघर्ष सुरु झाला. हा सत्तासंघर्ष न्यायालयात गेला होता.
या सोळा आमदारांविषयी अध्यक्ष घेणार निर्णय
एकनाथ शिंदे – कोपरी ठाणे (मुख्यमंत्री)
यामिनी जाधव – भायखळा
लता सोनावणे – चोपडा ( जळगाव)
अब्दुल सत्तार – सिल्लोड (कृषी मंत्री)
तानाजी सावंत – भूम/परंडा (आरोग्यमंत्री)
संदीपान भुमरे – पैठण (रोजगार हमी, फलोत्पादन)
भरत गोगावले – महाड
संजय शिरसाट – छ६पती संभाजीनगर (पश्चिम)
प्रकाश सुर्वे – मागाठाणे
बालाजी किणीकर- अंबरनाथ
बालाजी कल्याणकर – नांदेड
अनिल बाबर – खानापूर
संजय रायमुलकर – मेहकर लोणार (नांदेड)
रमेश बोरनारे – वैजापूर
महेश शिंदे – कोरेगाव
चिमणराव पाटील- पारोळा एरंडोल, जळगाव
(Edited By : Mangesh Mahale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.