Narendra Modi-Sharad Pawar-Supriya Sule
Narendra Modi-Sharad Pawar-Supriya Sule Sarkarnama
मुंबई

Sule Reply To Modi : मोदींच्या पवारांवरील टीकेला सुप्रिया सुळेंचे उत्तर; ‘याच सरकारने पवारांना पद्मविभूषण...’

Vijaykumar Dudhale

Mumbai News : शिर्डीतील दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोरच टीका केली हाेती. त्याला राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर देण्यात येत आहे.

पवारांच्या बचावासाठी खुद्द सुप्रिया सुळे मैदानात उतरल्या आहेत. ‘शेती आणि राजकीय’ क्षेत्रातील योगदानाबद्दल याच मोदी सरकारने शरद पवारांना पद्मविभूषणने सन्मानित केले होते, अशी आठवण सुळेंनी सांगितली. (Supriya Sule's reply to narendra Modi's criticism on sharad Pawar)

पंतप्रधान मोदी हे गुरुवारी (ता. २६ ऑक्टोबर) नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. निळवंडे धरणाचे लोकार्पण आणि विविध विकासकामांचे उद्‌घाटन मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर शिर्डीत झालेल्या सभेत बोलताना मोदी यांनी ‘पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केले’ असा सवाल विचारला होता. त्याला खासदार सुळे यांनी उत्तर दिले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने शरद पवार यांना शेती आणि राजकीय क्षेत्रातील विकासाच्या कामाबद्दल पद्मविभूषण ही पदवी प्रदान केलेली आहे. टीका-टिप्पणी एवढा तर अधिकार राजकारण्यांना असतोच ना.

मोदी महाराष्ट्रात आल्यावर शरद पवार यांच्यावर टीका करतात. मोदी यांचं महाराष्ट्रात स्वागत आहे. त्यांनी महाराष्ट्रात जरूर यावं आणि पवार यांच्यावर टीका करावी. आपलं हेच एक नाणं आहे, जे मार्केटमध्ये खणखणीत चालतं, असा दावाही खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.

मोदी हे महाराष्ट्रात आल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षबद्दल बोलताना नेहमी नॅचरली करप्ट पार्टी असे म्हणायचे. मोदी यांनी या वेळी कुठलाही करप्शनचा आरोप आमच्यावर केला नाही, असा चिमटाही खासदार सुळे यांनी काढला.

मोदी नेमकं काय म्हणाले होते?

महाराष्ट्राचे एक वरिष्ठ नेते केंद्र सरकारमध्ये अनेक वर्षे कृषिमंत्री राहिले आहेत. व्यक्तिगत आयुष्यात मी त्यांचा सन्मानही करतो. पण, त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले. त्यांनी आपल्या कार्यकाळात देशभरातील शेतकऱ्यांकडून केवळ साडेतीन लाख रुपये कोटी रुपयांचे धान्य ‘एमएसपी’वर खरेदी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT