Supriya Sule Sarkarnama
मुंबई

संजय राऊतांसोबतच्या डान्सवर टीका करणाऱ्यांना सुप्रिया सुळेंनी सुनावलं!

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या लेकीचं सोमवारी धुमधडाक्यात लग्न झालं.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या लेकीचं सोमवारी धुमधडाक्यात लग्न झालं. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचा मुलगा मल्हार हे त्यांचे जावई आहेत. कन्या पूर्वशीचा विवाहाआधी राऊतांनी संगीत कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात राऊत आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी डान्स केलेला व्हिडीओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला.

अनेकांनी या व्हिडीओचं कौतूक केलं. तर काहींनी त्यावर टीकेचा सुर लावला. या टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी चांगलंच सुनावलं आहे. 'आमच्या घरातल्या मुलीचं लग्न होतं. तौ कौटुंबिक कार्यक्रम होता. त्यात बाहेरचं कुणीच नव्हतं. आमच्या खासगी कार्यक्रमात आम्ही काय करतो, यावर टीका करायची असेल तर कुणाला काय बोलणार,' असा प्रतिप्रश्न करत सुप्रिया सुळे यांनी टीकारांना सुनावलं आहे.

भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही सुप्रिया सुळे व संजय राऊतांच्या डान्सवर टीका केली होती. एसटी कर्मचारी, शेतकरी आत्महत्या करत असताना तुम्ही लग्नात नाचत आहात. वीज कनेक्शन तोडले जात असताना गावे अंधारात आहेत. हीच महाविकास आघाडीची कर्तबगारी आहे का, असा सवाल करत विखे पाटील यांनी डान्सवर टीका केली होती.

नेमकं काय घडलं होतं?

कन्या पूर्वशीच्या लग्नानिमित्त यांच्याकडे तीन दिवसांपूर्वी संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मुंबईतील रेनेसाँ या सप्ततारांकित हॉटेलमध्ये संगीत कार्यक्रम पार पडला. या संगीत कार्यक्रमातील त्यांच्या डान्सचा व्हिडीओ सध्य़ा सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. संगीत कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळेंसोबत त्यांनी ठेका धरला होता. लंबोर्गिनी चलाई जाने ओ… गाण्यावर दोघांचा डान्स करतानाचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

लग्नाआधी आयोजित केलेल्या संगीत कार्यक्रमात अनेक नेते उपस्थित होते. यावेळी सुप्रिया सुळेंनी केलेल्या आग्रहानंतर संजय राऊतांनी ठेका धरत डान्स केला. यावेळी संजय राऊतांच्या पत्नी वर्षा राऊतदेखील उपस्थित होत्या. सुप्रिया सुळेंनी आग्रह केल्यानंतर त्यांनीही डान्स करत आनंद लुटला. यावेळी सुप्रिया सुळेसोबत त्यांचे कुटूंबीय देखील हजर होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT