Sushil Kedia_Raj Thackeray 
मुंबई

Sushil Kedia: "30 वर्षे मुंबईत राहतो...मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा"; मुजोर व्यापाऱ्याचं थेट राज ठाकरेंना आव्हान

Sushil Kedia: या व्यावसायिकानं मराठी हिंदींच्या वादात उडी घेतली असून सोशल मीडियावर एक पोस्ट करुन ती थेट राज ठाकरेंना टॅग केली आहे.

Amit Ujagare

Sushil Kedia: महाराष्ट्रात हिंदीविरोधातील वातावरण आता चांगलंच तापायला लागलं आहे. मीरा-भाईंदर इथं मनसेच्या कार्यकर्त्यांनी मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या एका दुकानदाराला मारहाण केल्यानंतर आता आणखी एका व्यापाऱ्यानं आपली मुजोरी दाखवून दिली आहे. सुशील केडिया असं या व्यापाऱ्याचं नाव असून त्यानं "मी मराठी बोलणार नाही, काय करायचंय ते करुन घ्या" अशा शब्दांत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. विशेष म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना टॅग करुन त्यानं थेट आव्हानच दिलं आहे. त्याच्या या मुजोरपणामुळं सध्या मुंबईत वातावरण चांगलंच तापलं आहे.

काय केलीए पोस्ट?

सुशील केडीया यांनी काल संध्याकाळी ट्विटरवर इंग्रजीत एक पोस्ट केली. यामध्ये त्यांनी सुरुवातीलाच म्हटलं की, राज ठाकरेंनी याची नोंद घ्यावी. पुढे ते लिहितात, "मी गेल्या ३० वर्षांपासून मुंबईत राहतो तरी देखील मला मराठी व्यवस्थित येत नाही. पण हिंदी भाषिकांना तुम्ही देत असलेल्या वाईट वागणुकीमुळं मी आता असा निश्चिय केला आहे की, जोपर्यंत तुमच्यासारख्या लोकांना मराठी माणसांच्या काळजीचं नाटक करण्याची परवानगी मिळत राहील तोपर्यंत मी प्रतिज्ञा करतो की, मी मराठी बोलणार नाही, काय करता बोला?"

दरम्यान, या पोस्टनंतर पुन्हा एकदा सुशील केडियांनी ट्विट करत आपल्याला धमक्या येत असल्याचं म्हटलं आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई पोलीस आयुक्तांना टॅग करत त्यांनी आपल्याला सुरक्षा देण्यात यावी अशीही मागणी केली आहे. पण या प्रकारानंतर राज ठाकरे किंवा मनसेची यावर अद्याप कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मनसे यावर कशा प्रकारे व्यक्त होते हे पाहावं लागणार आहे.

कोण आहे सुशील केडिया?

सुशील केडिया हे फायनान्शिअल एक्सपर्ट असून शेअर बाजाराच्या व्यवसायात काम करतात. 'केडियानॉमिक्स' नावाची त्याची कंपनी असून या कंपनीचे ते संस्थापक आणि सीईओ आहेत. शेअर बाजारात ट्रेडिंगचा या कंपनीचा व्यावसाय आहे. सेबीकडंही ही कंपनी रजिस्टर असल्याचं सुशील केडियाच्या सोशल मीडियावरील प्रोफाईलवरुन कळतंय. सुशील केडिया हे अनेकदा अर्थविषयक वृत्तवाहिन्यांवर शेअर मार्केटसंदर्भातील ट्रेंड विषयी तज्ज्ञ म्हणून बोलावले जातात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT