मुंबई : शिवाजी पार्कवर काल दसऱ्याच्या दिवशी उद्धव ठाकरे यांचा मेळावा पार पडला. ठाकरे यांच्या भाषणापूर्वी शिवसेनेच्या अनेक नेते व प्रवक्त्यांचे भाषण झाले. यामध्ये शिवसेनेत नव्याने दाखल झालेल्या सुषमा अंधारे यांच्या भाषणाची सोशल मीडियावर एकच चर्चा होती. शिवसैनिकांनीही त्यांच्या भाषणाला प्रतिसाद दिला. अंधारेंनी नारायण राणे, रामदास कदम, किरीट सोमय्या आणि शिंदे गट आणि भाजप नेत्यांवर आपल्या जोरदार शैलीत हल्लाबोल केला.
आपल्या भाषणात सुषमा अंधारे म्हणाल्या की, शिवसेनेच्या हिंदुत्वावर टीका करणाऱ्यांनी हिंदू धर्मातील कोणत्या ग्रंथात इतर धर्माचा द्वेष करा, असं लिहलं आहे ते सांगावे. मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, अनेक मुस्लिम आज शिवसेनेच्या जवळ येत असल्यामुळेच अनेकांना त्याचा त्रास होत आहे, असेही अंधारे म्हणाल्या.
शिवाजी पार्कवर जाऊन सोनियांचे विचार ऐकायचे का ? असे नारायण राणे म्हणाले होते. याचा समाचार घेत अंधारे यांनी राणेंवर टीका केली. याच सोनिया गांधींच्या पायावर दहा वर्षे लोटांगण घालत काँग्रेसमध्ये आमदार, खासदार, मंत्रिपदे मिळवली त्यांनीच उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करावी, हे फार हास्यास्पद आहे,' प्रताप सरनाईक, श्रीकांत शिंदे आदी त्यांचे विद्यमान मतदारसंघ जागा भाजपला देण्याची हिंमत दाखवतील का, असा सवालही त्यांनी केला.
ईडीमुळेच या सर्वांना हिंदूत्व आठवले आहे. मात्र ठाकरे यांनी कधीच हिंदूत्वाला सोडले नाही. दिवंगत शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या पत्नी उमेदवार असतानाही, शिंदे गटाने त्यांना पाठिंबा द्यायला हवे, मात्र त्यांनी ती जागा भाजपला दिली. यावेळी त्यांनी राणे यांच्या मुलांचा उल्लेख ‘वाह्यात बाजारबुणगे’ असा केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.