Parambir Sinh Latest news Update: राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय़ घेतला आहे. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करणारे माजी पोलिसी आयुक्त परमबीर सिंह यांचे निलंबन मागे घेतले आहे. शिंदे-फडणवीस सरकारने २०२१ मधील निर्णय मागे घेतला आहे. (Suspension of former Police Commissioner Parambir Singh reverse)
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर शंभर कोटींच्या वसुलीचा आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Sinh) यांना राज्य सरकारने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती.
मार्च २०२० मध्ये मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहीले होते. या पत्रात परमबीर सिंह यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे आणि इतर दोन पोलीस अधिकाऱ्यांना शहरातील बार मालकांकडून महिन्याला १०० कोटी वसूल करण्याचा आदेश दिले होते, असा गंभीर आरोप केला होता. सिंह यांच्या या आरोपांनंतर एकच खळबळ उडाली होती. विरोधकांनी धाारेवर धरल्यानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला.
याच काळात परमबीर सिंह हे सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ गायब होते. 25 नोव्हेंबरला मुंबईत परतले. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना ६ डिसेंबपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले होते. अटकेपासून तात्पुरते संरक्षण मिळाल्यानंतर त्यांनी आपण चंदिगडमध्येच असल्याचं सांगत लवकरच मुंबईत तपास यंत्रणांपुढे हजर होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. दुसऱ्या दिवशी ते थेट कांदिवली गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर झाले होते. त्याचवेळी चौकशीदरम्यान त्यांना अटक करण्यात आली.
अकोल्यातील निरीक्षक बी. आर. घाडगे यांच्या तक्रारीवरून सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मे महिन्यात हे प्रकृतीचे कारण देत ५ मेपासून परमबीर सिंह रजेवर गेले. आपल्यावर शस्त्रक्रिया झाल्याचा दावाही त्यांनी केला. याच काळात भाईंदर येथील विकासक श्यामसुंदर अग्रवाल यांच्या तक्रारीवरून सिंह आणि काही पोलीस अधिकाऱ्यांनी २० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप करणाऱ्या मरिन ड्राइव्ह पोलिसांनी सिंह यांच्याविरुद्ध दुसरा गुन्हा दाखल झाला. तसेच ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यातही सिंह आणि इतर चार आरोपींविरुद्ध अपहरण, खंडणी, फसवणूक केल्याप्रकरणी तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.