Ravikant Tupkar Sarkarnama
मुंबई

Ravikant Tupkar : तुपकर नेमके कुठे आहेत ; पोलिसांचं टेन्शन वाढलं, अल्टिमेटम संपला..

Ravikant Tupkar news update : तुपकर आता काय भूमिका घेणार याकडे सगळ्याचे लक्ष लागलं आहे.

सरकारनामा ब्युरो

Ravikant Tupkar news update : शेतकऱ्यांच्या कापूस सोयाबीनला भाव मिळत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. तुपकर हे चार दिवसापासून गायब असल्याने पोलिसांचे टेन्शन वाढलं आहे.

गेल्या मंगळवारी त्यांनी शेतकरी प्रश्नासंदर्भात पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी 10 तारखेपर्यंत आमच्या मागण्या मान्य करा, अन्यथा 11 फेब्रुवारीला बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर किंवा AIC विमा कंपनीच्या मुंबई स्थित कार्यालयासमोर शेतकऱ्यांसह आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. त्या दिवसापासून रविकांत तुपकर हे भूमिगत आहे.

तुपकर नेमके कुठे आहेत, याबबातची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलिसांनी त्यांचा शोध घेत आहेत. ते भूमिगत झाल्यामुळं पोलिसांचं टेन्शन वाढलं आहे. दरम्यान, तुपकरांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम आज (शनिवारी) संपला आहे. तुपकर आता काय भूमिका घेणार याकडे सगळ्याचे लक्ष लागलं आहे.

बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालय समोर किंवा मुंबईतील बॉम्बे स्टॉक एक्सचेंज कार्यालयाबाहेर आत्मदहन करण्याचा इशारा अकरा फेब्रुवारीला तुपकर यांनी दिला होता. त्यानंतर रविकांत तुपकर भूमिगत झाले आहेत. बुलढाणा, मुंबई पोलीस त्यांची शोधाशोध करीत आहेत.

याआधीच रविकांत तुपकर यांना आंदोलन स्थगित करण्याबाबत पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली आहे.आज रविकांत तुपकर हे शेतकऱ्यांसह बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर किंवा मुंबईच्या AIC पीक विमा कंपनीच्या कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT