Tanaji Sawant Sarkarnama
मुंबई

Tanaji Sawant : आरोग्य विभागात घोटाळ्याचा आरोप, मुख्यमंत्र्यांची स्थगिती; अखेर तानाजी सावंतांनी भडास काढली, म्हणाले...

Tanaji Sawant on Health Account Scam : अडीज हजार रुग्णालयांची स्वच्छता मनुष्यबळाच्या आधारे करणे शक्य नव्हते. तेव्हा यांत्रिक साफसाफईची निविदा मागवण्यात आली. महाटेंडरवर त्यासंदर्भात टेंडर मागवण्यात आले, असे तानाजी सावंत म्हणाले.

Roshan More

Tanaji Sawant News : सरकारी रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात यांत्रिकी पद्धतीने साफसफाई करण्याच्या कामाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्थगिती दिली. हे काम खासगी कंपनीला देण्यात आले होते. पूर्वी जे काम 70 कोटींत केले जात होते. ते काम 3 हजार 190 कोटी रुपये मर्जीतल्या एका कंपनीला दिल्याचे उघड झाले होते. त्यामुळे माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या समोरील अडचणी वाढल्या होत्या.

मागील तीन दिवसांपासून या घोटाळ्याविषयी चर्चा होती. अखेर आज (सोमवारी) विधीमंडळाच्या अधिवेशनासाठी दाखल झालेल्या तानाजी सावंत यांनी आपले मैन सोडले.

तानाजी सावंत म्हणाले, '3190 कोटींचा घोटाळा झाला, असे सांगितले जात आहे. पण महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीतून एकही रुपया गेला नसताना घोटाळा झाल्याचे म्हणणे चुकीच आहे. आरोप करणारे कुठल्या आभासी जगात राहत आहेत. जाणीवपूर्वक बदनाम करणं चुकीचं आहे. मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली नाही. '

'मी 24 महिन्यात 42 निर्णय घेतले. सरकारी रुग्णालयातील आयपीडी, ओपीडीची संख्या वाढली. रुग्णालयाच्या स्वच्छेतेचा प्रश्न होता तेव्हा यांत्रिकपद्धतीने स्वच्छता करण्याचे समोर आले. अडीज हजार रुग्णालयांची स्वच्छता मनुष्यबळाच्या आधारे करणे शक्य नव्हते. तेव्हा यांत्रिक साफसाफईची निविदा मागवण्यात आली. ', असे सावंत यांनी सांगितले

'महाटेंडरवर त्यासंदर्भात टेंडर मागवण्यात आले. तब्बल 12 कंपन्यांमध्ये स्पर्धा झाली. त्यातील पाच कंपन्या लिस्टेड झाल्या. आणि आत्ता जी कंपनी आहे तिला काम मिळाले. त्या कंपनीसोबत एमओयू झाले आणि त्यानंतर निवडणूका लागल्या. त्यामुळे पुढे काय झाले हे मला माहीत नाही.', असे देखील तानाजी सावंत म्हणाले.

कामाला स्थगिती नाही...

तानाजी सावंत म्हणाले, मला खात्याकडून माहिती मिळाली की असे कुठल्याही पद्धतीने एकही रुपयाचे ट्रान्झेक्शन कंत्राटदाराच्या खात्यावर झाले नाही. आयुक्तांनी देखील सांगितले की यावर बजेटरी प्लॅनिंग नसल्याने आम्ही हे थांबवतोय. मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितले की याला अशा कुठल्याही पद्धतीची स्थगिती दिली नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT