ED Arrest Shantanu Banerjee
ED Arrest Shantanu Banerjee Sarkarnama
मुंबई

Teachers Recruitment Scam: टीएमसीच्या बड्या नेत्याला ED कडून अटक

सरकारनामा ब्युरो

Teachers Recruitment Scam: शिक्षक भरती गैरव्यवहारात सक्तवसुली संचालनालयाकडून (ED) पश्चिम बंगालमध्ये कारवाई सुरु केली आहे. या प्रकरणी टीएमसीचे युवा नेते शंतनु बॅनर्जी यांना ईडीने अटक केली आहे. काल रात्री (मंगळवारी) ही कारवाई करण्यात आली

शिक्षक भरती प्रकरणी ईडीने यापूर्वी विशेष कोर्टात शंतनु बॅनर्जी यांना हजर करण्यात आले होते. त्यानंतर आता शंतनु बॅनर्जी यांना २४ मार्चपर्यंत ईडीच्या कोठडी ठेवण्याचे आदेश विशेष न्यायालयाने दिला आहे.

यापूर्वी शंतनु बॅनर्जी आणि टीएमसीचे युवा नेता कुंतल घोष यांना टीमसीने पक्षातून निलंबित केले आहे. दोघांनाही शिक्षक भरती गैरव्यवहारात अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने शंतनु बॅनर्जी यांना ११ दिवसाची ईडी कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.

घोष यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. शिक्षक गैरव्यवहार प्रकरणात दोघांचे नाव आल्याने टीएमसीच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी दोघांनाही पक्षाच्या सर्व पदावरुन काढून टाकले होते. यापूर्वी शंतनु आणि कुंतल यांच्या हुबळी येथे निवासस्थानी ईडीने छापेमारी केली होती.

ईडीने शंतनु यांची १० मार्च रोजी आठ तास कसून चौकशी केली होती.त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. ईडीने करण्यापूर्वी शंतनु यांची सात वेळा ईडीच्या कार्यालयात चौकशी केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT