जुई जाधव
Mumbai News: उद्धव ठाकरे यांच्या विरोधात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी यांनी निकाल दिला आहे. शिवसेना ही एकनाथ शिंदेंची असून त्यांचे आमदार अपात्र होऊ शकत नाही असा निकाल दिला आहे. निकालानंतर ठाकरे गटात तीव्र नाराजी आहे. अशातच ठाकरेंचा अजून एक शिल्लेदार मैदानात येणार असल्याची चर्चा आता सुरु झाली आहे.
शिवसेनेत झालेल्या ऐतिहासिक बंडानंतर एकीकडे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) शिवसेना (Shivsena) वाचवण्यासाठी राज्यभर दौरे करीत आहेत. अशातच राज्याच्या राजकारणात आणखी एका ठाकरेंची एन्ट्री होण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
राहुल नार्वेकर यांनी काल (बुधवारी) ऐतिहासिक निर्णय दिला. खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची असून उद्धव ठाकरेंचा काही हक्क नाही, हा निकाल त्यांनी दिला. निकाल लागल्यावर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मातोश्री या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राहुल नार्वेकरांच्या निर्णयाचा निषेध केला. मात्र या सगळ्यात त्यांच्यासोबत त्यांचा धाकटा मुलगा तेजस ठाकरे देखील उपस्थित होता. तेजस ठाकरे हे पत्रकार परिषदे दरम्यान उद्धव ठाकरेंच्या बाजूला उपस्थित होते. एरवी ज्या वेळी उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेतात तेव्हा आदित्य ठाकरे उपस्थित असतात, मात्र काल आदित्य ठाकरे दौऱ्यावर असल्याने तेजस ठाकरेंची उपस्थित पाहायला मिळाली.
निकाल लागण्याआधी तेजस ठाकरे यांनी माध्यमांशी अनऔपचारिक चर्चा केली. या चर्चे दरम्यान त्यांनी भाष्य केलं की, निकाल काय लागणार हे आम्हाला माहित होतं, मात्र आता आमचं पुढचं पाऊल हे जोरदार असणार आहे. त्यांच्या या विधानामुळे आता सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. ठाकरेंचा दुसरा मुलगा देखील राजकारणात येणार का अशी चर्चा आता सर्वत्र सुरु झाली आहे. तेजस ठाकरे यांनी हे सूचक विधान केल्याने त्यांची आता एन्ट्री होणार का याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे.
उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव आणि आदित्य ठाकरेंचे छोटे बंधू तेजस ठाकरे यांच्या नावाची चर्चा आता सर्वत्र सुरु झाली आहे. तेजस ठाकरे यांचा देखील एक वेगळा चाहता वर्ग तयार झाला आहे. त्यांच्या नावाचे बॅनर देखील अनेक वेळेला पाहायला मिळतात. तेजस ठाकरे हे उद्धव ठाकरेंसोबत त्यांच्या मुंबईत होणाऱ्या सगळ्या सभांना उपस्थिती लावतात. मात्र शिवसेनेचे मध्ये बंडखोरी झाल्यामुळे मोठी वाताहात झाली. एकीकडे आदित्य ठाकरे ग्राउंडवर उतरून महाराष्ट्र पिंजून काढत असताना दुसरीकडे तेजस ठाकरे यांच्या नावाची चर्चा सुरु झाली. आजचा छावा, उद्याचा वाघ या आशयाचे बॅनर तेजस ठाकरेंच्या झळकत आहेत. गिरगांवात देखील तेजस ठाकरेंच्या नावाचे बॅनर दिसले. तेजस ठाकरे यांच्या एन्ट्रीची चर्चा जोमात सुरु असताना कार्यकर्त्यांकडून त्यांच्या समर्थनात बॅनर देखील लावण्यात आले.
शिवसेनेचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे यांना वाईल्ड लाईफ मध्ये अधिक रस आहे. त्यांना राजकारणात सक्रिय झालेले आपण कधीच पाहिलेले नाही. आदित ठाकरे यांच्या प्रचारात तेजस ठाकरेंची महत्वाची भूमिका दिसली. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे दुसरे चिरंजीव तेजस ठाकरे यांनी कोकणातील पश्चिम घाटात नव्या सापाच्या प्रजातीचा शोध घेतल्याची माहिती समोर आली आहे.
तेजस ठाकरे आणि त्यांच्या टीमने सह्याद्रीच्या खोऱ्यात मोठी कामगिरी केली आहे. शोधण्यात आलेल्या नव्या सापाच्या प्रजातीला नावही देण्यात आलं आहे. ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनच्या माध्यमातून नव्या सापाचा शोध घेण्यात आला आहे. या संस्थेकडून पश्चिम घाटात सुरू असलेल्या संशोधनावेळी नव्या सापाच्या प्रजातीचा शोध लागला आहे. त्यामुळं आता ठाकरेंच्या पुत्राने शोधलेल्या नव्या सापाला सह्याद्री ओफिस असं नाव देण्यात आलं आहे.
Edited by: Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.