Bharat Jodo Nyay Yatra  Sarkarnama
मुंबई

Tejaswi Yadav Mumbai Speech : महाराष्ट्र सरकार म्हणजे 'डिलर्स पार्टी' ; मुंबईत येऊन बिहारीबाबूने ललकारलं!

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Political News : भाजपने महाराष्ट्रात घोडेबाजार करून आमदार फोडले. आता तेच सरकारमध्ये आहेत. मात्र या सरकारमध्ये कुणीही लिडर्स नाहीत तर डिलर्स बसलेले आहेत, असे म्हणत बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादवांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही नाव न घेता निशाणा साधला. (Bharat Jodo Nyay Yatra)

काँग्रेसनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप इंडिया आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या उपस्थित मुंबईत झाला. त्यावेळी तेजस्वी यादावांनी केंद्र सरकारसह राज्य सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली. ते म्हणाले, महाराष्ट्रात भाजपने केंद्रीय तपास यंत्रणांच्या भितीतून आमदारांचा घोडेबाजार केला. त्यातून राज्यात सत्तांतर केले. या सरकारमध्ये कुणीही लिडर्स नसून सर्व डिलर्स आहेत. शरद पवारांच्या नावाने मत मागायचे आणि भाजपशी डिलिंग करायची, उद्धव ठाकरेंच्या नावाने मते मागितली आणि भाजपशी डिलिंग केली, राहुल गांधींच्या नावाने मते मागितली आणि भाजपशी डिलिंग केली. या लोकांनी फक्त डिलिंग केले, अशी टीका यादवांनी केली. (Tejaswi Yadav Mumbai Speech )

नरेंद्र मोदी खोट्याचे डिस्ट्रीब्यूटर

आम्ही घाबराणारे नाहीत, असे म्हणत तेजस्वी यांनी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादवांचा एक संदेश आणण्याचे सांगितले. ते म्हणाले. लालूप्रसाद यादवांनी भाजपशी लढण्यात आयुष्य घालवले. त्यांच्याशी लढता लढता आता त्यांचे केस पांढरे झाले आहेत. मात्र ते कधीही दबावापुढे झुकेले नाहीत, सतत लढत राहिले. रेटून खोटे बोलणाऱ्या भाजपपासून सावध राहावे, कारण ते शेणालाही हलवा म्हणून विकतात. पंतप्रधान मोदी खोट्याचे उत्पादन करतात, ते खोट्याचे घोऊक विक्रेते असून देशभरातील वितरक आणि विक्रेतेही आहेत, असा घणाघात तेजस्वी यादवांनी केला.

नितीश कुमारांची गॅरंटी घ्या

महाराष्ट्रातील आमदारांना भिती दाखवण्याचे काम झाले, बिहारमध्ये मात्र आमच्या काकांनाच भाजपने पळवून नेले. आता लोकसभेसाठी मोदी देशभार त्यांच्या गॅरंटीची गॅरंटी देत फिरत आहेत. आता त्यांनी एकच गॅरंटी द्यावी, की आमचे काका नितीशकुमार पुन्हा पलटणार नाहीत म्हणून, असा टोलाही यादवांनी लगावला.

देशातील द्वेष संपवायचा

सध्या देशात द्वेषाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा द्वेष, भेदभाव संपवण्यासाठी किती वर्षे लागतील हे आता काही सांगता येणारी नाही. त्यासाठी आपण सत्तेत येऊ अगर न येवो, मात्र आपल्याला देशातील द्वेष, भेदभाव कमी करण्यासाठी सतत यात्रांचे आयोजन करावे लागणार आहे. आपल्याला काय लोकांत राहावे लागणार आहे. राहुल गांधी उघडलेले प्रेमाचे दुकान सताड उघडे ठेवावे लागणार आहे, असे आवाहनही तेजस्वी यादवांनी केले.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT