CM Uddhav Thackeray Latest Marathi News, Ravi Rana Latest News, Navneet Rana Latest News, Maharashtra Political News Updates
CM Uddhav Thackeray Latest Marathi News, Ravi Rana Latest News, Navneet Rana Latest News, Maharashtra Political News Updates Sarkarnama
मुंबई

राणा दांपत्याला ठाकरे सरकारचा आणखी एक दणका ; मीडियाशी बोलणं पडणार महागात

सरकारनामा ब्युरो

मुंबई : अमरावतीच्या लोकसभा खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना रविवारी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर त्यांनी व त्याचे पती आमदार रवी राणा (ravi Rana) यांनी माध्यमांशी संवाद साधला. (Navneet Rana Latest News in Marathi)

जामीन देताना राणा दांपत्याला माध्यमांशी न बोलण्याची अट न्यायालयाने घातली आहे. या अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांचा जामीन रद्द करण्यासाठी राज्य सरकरानं न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. जामीनाच्या अटीशर्तींचा भंग केल्याचा आरोप यात करण्यात आला आहे.

मीडियाशी न बोलण्याच्या अटीचं राणांनी उल्लंघन केल्याचा दावा राज्य सरकारकडून करण्यात आला आहे. आज सकाळी अकरा वाजता मुंबई पोलिसांनी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.

विशेष सरकारी वकील प्रदीप घरत (Praddep Gharat) म्हणाले, "मी नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या काही क्लिप पाठवल्या आहेत. त्या क्लिप काळजीपूर्वक पाहिल्यानंतर, मला वाटते की त्यांचे संभाषण त्यांना जामीन आदेशात घालण्यात आलेल्या अटींचे उल्लंघन करते. त्यामुळे मी ते न्यायालयासमोर आणण्यास बांधील आहे. मी न्यायालयाला विनंती करीन की त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करून त्याला ताब्यात घ्यावे,"

नवनीत राणा यांनी रविवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले. "मी उद्धव ठाकरेंना आव्हान देते की त्यांनी मतदारसंघ निवडा आणि थेट जनतेने निवडून या. मी त्यांच्या विरोधात लढेन. मी प्रामाणिकपणे काम करून निवडणूक लढवणार आहे.

" मी जिंकेन आणि त्यांना (मुख्यमंत्र्यांना) जनतेच्या शक्तीची जाणीव होईल. शिवसेनेची भ्रष्ट राजवट संपवण्यासाठी मुंबईत प्रचार करणार असून रामभक्तांना पाठिंबा देणार असल्याचेही नवनीत राणा यांनी काल माध्यमांना सांगितलं.

नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांना मुंबई पोलिसांनी 23 एप्रिल रोजी अटक केली होती. या जोडप्याने मुख्यमंत्री ठाकरे यांच्या 'मातोश्री' या खाजगी निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसाचे पठण करणार असल्याची घोषणा केली होती, त्यामुळे शिवसेना आणि राणा दांपत्य यांच्यात राडा झाला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT