Ambadas Danve, Prasad Lad Sarkarnama
मुंबई

Ambadas Danve: 'रात्रभर झोप लागली नाही'; लाड यांच्या वक्तव्यावर दानवे म्हणाले,'लाड राजकारणात नवीन आहेत त्यांनी...'

Ambadas Danve taunt to Prasad Lad Legislative Council: त्यांना आता नियम कायदे संविधान सगळं आठवायला लागलं हे चांगलं झालं याच्या आधी त्यांना कायदे म्हणजे आपल्या घरची जहागीर वाटत होती. त्यामुळे झालं ते चांगलं झालं.

Jagdish Patil

'भाजपने राहुल गांधी यांच्यासह दीडशे खासदारांना निलंबित केले होते. त्यामुळे त्यांनी संसदीय नियम आणि कायदे मला आणि उद्धव ठाकरेंना शिकवण्याची गरज नाही,' अशा शब्दात विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.

विधान परिषदेत काल कामकाजादरम्यान भाजप आमदार प्रसाद लाड (Prasad Lad), प्रवीण दरेकर आणि शिवसेना नेते अंबादास दानवे यांच्यात जोरदार राडा झाला. यानंतर भाजपने आक्रमक पवित्रा घेत दानवे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यासाठी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी सत्ताधाऱ्यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर ठिया मांडला होता. जोरदार घोषणाबाजी करीत त्यांनी दानवे यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

या सर्व पार्श्वभूमीवर दानवे यांना माध्यमांना प्रतिक्रिया दिली. त्यांना पत्रकारांनी प्रसाद लाड यांना रात्रभर झोप लागली नाही, या वक्तव्यावर विचारले असता दानवे म्हणाले, "लाड राजकारणात नवीन आहेत त्यांनी बिनधास्त रात्रभर झोपायला पाहिजे होतं. आम्ही निवांत झोपतो."

विरोधकांनी राजीनाम्यासाठी पायऱ्यावर आंदोलन केलं आहे यावर प्रतिक्रिया देताना दानवे म्हणाले, "पायऱ्यांवर काय होणार आहे त्यांनी परिषदेत जावे, सभापतीकडे जावे किंवा कोर्टात जा. सत्ताधाऱ्यांना जे काही करायचं ते करू द्या त्यांना आता नियम कायदे संविधान सगळं आठवायला लागलं. इतके दिवस त्यांना कायदे घरी पाणी भरणारे वाटतं होते. त्यामुळे झालं ते चांगलं झालं."

या सर्व प्रकरणासंदर्भात आपलं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी काही बोलणं झालं आहे का? याबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले याबाबतची माहिती जाहीर करायची नसते. मात्र मी घाबरणारा पळपुटा नाही. मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे, मी बोललो कारण त्यांनी सभापतीशी बोलायला पाहिजे होतं, माझ्याशी बोलण्याची गरज नव्हती, अशा शब्दात दानवे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT