Eknath Shinde, Sushama Andhare News Sarkarnama
मुंबई

Sushama Andhare News : मुख्यमंत्री महोदय कायदा टेंभी नाक्याच्या दावणीला बांधलाय काय ? अंधारेंचा खरमरीत सवाल

Eknath Shinde Group Mla : शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांच्या ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत.

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांच्या ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. त्यावरुन राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना या प्रकरणी विरोधकांनी जाब विचारला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर मतदारसंघाचे आमदार संजय रायमुलकर यांनी ग्रामपंचायत सदस्याला तर जळगाव जिल्ह्यातील आमदार किशोर पाटील यांनी पत्रकाराला शिवीगाळ केली. यावरुन ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषणा अंधारे (Sushma Andhare) यांनी मुख्यमंत्री महोदय कायदा टेंभी नाक्याच्या दावणीला बांधलाय काय ? असा खरमरीत सवाल केला आहे.

शिंदे गटातील या दोन्ही आमदारांच्या ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर अंधारे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून शिंदेंना सवाल केला आहे. आपल्या पोस्टमध्ये अंधारे म्हणाले, ''शिंदेंचे आमदार हे आपापल्या खात्याची कामगिरी किंवा मतदार संघाचे प्रश्न सोडवण्यासाठी कमी आणि गुंडगिरी दादागिरी अपहरण मारहाण शिवीगाळ करण्यामुळे जास्त चर्चेत येत आहेत,'' असा टोला त्यांनी लगावला.

''सुरुवातीच्या काळात हातपाय तोडण्याची भाषा करणारे मेहकरचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad), दिसेल तिथे टपरेगिरी आणि गुंडगिरी करणारे आमदार संतोष बांगर, हवेत गोळीबार करणारे प्रकाश सुर्वे अशी निवडक यादी होती. मग फक्त पुरुष आमदारच कशाला मग महिला आमदार ही मागे राहिल्या नाहीत. अधिकाऱ्याला मारहाण करत त्या मारहाणीचे समर्थन करणाऱ्या गीता जैन, पत्रकाराला शिवीगाळ, मारहाण करून वर त्याचे समर्थन करणारे आमदार किशोर पाटील (Kishore Patil), अपहरण कांडाचा सूत्रधार आमदार पुत्र राज सुर्वे आणि आज पुन्हा एकदा गलिच्छ आणि अर्वाच्य शिवीगाळ करत त्या शिवीगाळीच समर्थन करणारा आमदार संजय रायमुलकर''.

''स्वतःच केलेल्या अश्लील अर्वाच्य शिविगाळी चे आणि अमानुष मारहाणीचे हे सर्व आमदार वर तोंड करून समर्थन करतात आणि आम्हीच केले असा टेंभा मिरवतात याचा अर्थ असा आहे, की यांना कायद्याची कसलीच भीती राहिलेली नसल्याचेही अंधारे म्हणाल्या आहेत. शिंदे गटाच्या या सगळ्या आमदारांची कामगिरी जर बघितली तर मतदारसंघातले प्रश्न सोडवणे लांबच राहिले. पण कधी यांचे कुठल्यातरी रॅलीतले जीप वरचे व्हिडिओ व्हायरल होतात तर कधी कुणाला तरी दमदाटी आणि धमकावणी करतानाचे ऑडिओ व्हायरल होतात,'' असे त्या म्हणाल्या.

''पण सर्वसामान्यांचे सरकार म्हणत थापा मारणारे मुख्यमंत्री महोदय मात्र यातल्या एकावरही कसलीही कारवाई करत नाहीत. उलट असा उर्मटपणा करणारे महिलांशी असभ्य वर्तन आणि असभ्य भाषेत बोलणारे हे गुंडगिरी करणारे आमदार मुख्यमंत्र्यांच्या आजूबाजूला बगलबच्चे म्हणून वावरत असतात. मुख्यमंत्री महोदय कायदा टेंभी नाक्याच्या दावणीला बांधलाय काय ?'' असा सवाल त्यांनी केला.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT