Arvind Sawant, Deepak Kesarkar  Sarkarnama
मुंबई

Arvind Sawant: '' पळालेल्या उंदरांनी आम्हांला...'', ठाकरे गटाच्या खासदाराचा केसरकरांवर हल्लाबोल

Arvind Sawant On Deepak Kesarkar Statement: जे मिंधे आणि लाचार होतात, त्यांना स्वाभिमानाबद्दल बोलण्याचा अधिकार नाही...

सरकारनामा ब्यूरो

Arvind Sawant On Deepak Kesarkar Statement: हिवाळी अधिवेशनात उद्धव ठाकरे आणि मंत्री दीपक केसरकर समोरासमोर आले होते. त्यावेळी ठाकरेंनी दीपक केसरकरांना खडेबोल सुनावतानाच आपली नाराजी देखील बोलून दाखवली होती. यानंतर केसरकरांनी देखील कटुता कमी करणं हे उध्दव ठाकरे यांच्याच हाती असून त्यांनी आत्मपरीक्षण करायला हवं असं पलटवार करतानाच ठाकरेंना सल्ला देखील दिला होता. त्यावर ठाकरे गटाचे नेते व खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी केसरकरांना चांगलाच टोला लगावला आहे.

खासदार अरविंद सावंत यांनी शिंदे गटाचे नेते व शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकरांवर टीकेची झोड उठवली आहे. सावंत म्हणाले, घरातून पळून गेलेले उंदीर सांगत आहेत, घर कसे सांभाळायचं. ज्यावेळी आपलं घर पेटत आहे असं वाटत असतानाच घरातील उंदीर पहिले पळाले. त्यामुळे दुसरीकडे घरोबा करणाऱ्यांनी आम्हांला सल्ला देण्याचा नैतिक अधिकार आणि अधिष्ठान दोन्ही गमावले आहे. त्यामुळे त्यांची गंभीर दखल घेण्याची गरज नाही.

जे मिंधे आणि लाचार होतात, त्यांना स्वाभिमानाबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. पळालेल्या उंदरांनी आम्हाला शिकवण्याची गरज नाही असे म्हणत सावंत यांनी केसरकरांवर हल्लाबोल केला आहे.

केसरकर नेमकं काय म्हणाले होते?

उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मला आदर आहे. कटूता कमी करणं त्यांच्या हातात आहे. त्यांचा आदर ठेवणारा मी मनुष्य आहे. उद्धव ठाकरे मला ज्यावेळी भेटले तेव्हा मी त्यांना काहीच उत्तर दिलेलं नव्हतं. जेव्हा घर पेटतं तेव्हा अगोदर आग विझवावी लागते असं मी त्यांना सांगितलं. पण त्यांनी ऐकलं नाही. मात्र टीव्हीवर जे दाखवण्यात आलं त्याचं दु:ख वाटलं.

तसेच हिवाळी अधिवेशनातील माझ्या आणि ठाकरेंच्या भेटीवर आगामी एक किंवा दोन दिवसांत बोलेन तेव्हा सत्य समजेल असं सांगतानाच त्यांनी आत्मपरीक्षण केले तर शिवसेना पुन्हा एकदा एकसंध होण्यास वेळ लागणार नाही असं सूचक विधान देखील केसरकरांनी यावेळी केलं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT